Schools Closed : सध्या महाराष्ट्रासह सबंध देशभरात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कालपरवा पावसाने हजेरी लावली. मुंबईत आणि कोकणात ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ हवामान पाहायला मिळाल.
मुंबईत आणि कोकणात झालेल्या पावसामुळे तेथील थंडीचे तीव्रता आणखी वाढली आहे. मुंबई शहर उपनगर सह कोकणातील जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा पावसामुळे कमालीचा खाली आला आहे आणि यामुळे कडाक्याच्या थंडीचा अनुभव येतोय.

राज्याप्रमाणेच उत्तर प्रदेश मध्ये देखील थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून उत्तर प्रदेश राज्यांमधील नर्सरी पासून ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार युपी मधील शाळा पुढील तीन दिवस बंद राहणार आहे.
शनिवारी यूपी मधील शाळांना सुट्टी दिली जाणार आहे. रविवारी नेहमीची सुट्टी मिळणार आहे. तसेच आता सोमवारी सुद्धा शाळा बंद ठेवाव्यात असे आदेश शासनाकडून नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. म्हणजेच युपी मधील शालेय विद्यार्थ्यांना आता 5 जानेवारी 2026 पर्यंत सुट्टी मिळणार आहे.
नर्सरी पासून ते अगदीच बारावीपर्यंतच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कालावधीत सुट्टी देण्याचा महत्त्वाचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतलेला आहे. ICSE व CBSE सह यूपी राज्य बोर्डाच्या शाळा सुद्धा 5 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. थंडीच्या लाटेमुळे हा निर्णय घेण्यात आला असून अधिकाऱ्यांनी थंडीची लाट असणाऱ्या परिसराला भेट द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील अधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये ब्लॅंकेट आणि शेकोटीची योग्य ती व्यवस्था करून द्यावी जेणेकरून थंडीची तीव्रता कमी करता येईल असे स्पष्ट आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. राज्यात कोणीही उघड्यावर झोपणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायची आहे
तसेच रात्र निवाऱ्याची कायम राखण्याची जबाबदारी सुद्धा अधिकाऱ्यांची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच यूपी सरकारकडून जारी करण्यात आले असून या निर्णयामुळे नक्कीच शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यूपी मधील हाड गोठवणारी थंडी पहाता यूपी सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी दिलासादायी राहणार आहे.













