आता ‘या’ लोकांनाही भरावा लागणार आयकर ! इन्कम टॅक्स विभागाचा नवीन नियम, कधीपासून लागू होणार ? वाचा…

भारत सरकारच्या आयकर कायद्यानुसार, करदात्यांनी कमावलेल्या एकूण उत्पन्नाची 5 प्रकारांत विभागणी करण्यात आली आहे. 1) पगारातून मिळणारे उत्पन्न 2) घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न 3) व्यवसायातून मिळणारे उत्पन्न 4) भांडवली नफ्यापासून मिळणारे उत्पन्न आणि 5) इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हे ते पाच प्रकार. करदात्यांना आपले उत्पन्न या पाच प्रकारात दाखवावे लागते.

Published on -

Income Tax New Rules : भारतीय आयकर विभागाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना करचोरी थांबवण्यासाठी इन्कम टॅक्स च्या नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नवीन निर्णयामुळे करचोरी थांबणार असा सरकारचा विश्वास आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारत सरकारच्या आयकर कायद्यानुसार, करदात्यांनी कमावलेल्या एकूण उत्पन्नाची 5 प्रकारांत विभागणी करण्यात आली आहे. 1) पगारातून मिळणारे उत्पन्न 2) घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न 3) व्यवसायातून मिळणारे उत्पन्न 4) भांडवली नफ्यापासून मिळणारे उत्पन्न आणि 5) इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न हे ते पाच प्रकार. करदात्यांना आपले उत्पन्न या पाच प्रकारात दाखवावे लागते.

सध्या घर भाड्यातून जे काही उत्पन्न मिळतं ते उत्पन्न तिसऱ्या प्रकारच्या उत्पन्नात दाखवता येत आहे. म्हणजेच जे आयकरदाते घर भाड्यातून कमाई करतात त्यांना व्यवसायातून मिळणारे उत्पन्न या शीर्षकाखाली घर भाड्याचे उत्पन्न दाखवता येत होते.

पण, करपात्र रक्कम निश्चित करण्यासाठी तुम्ही एकूण उत्पन्नातून तुमचे खर्च वजा करू शकता. यामुळे घरमालकाचा फायदा होत असे. पण आता घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न दुसऱ्या प्रकाराच्या म्हणजेच घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न या प्रकारात दाखवावे लागणार आहे.

म्हणजेच आता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे. थोडक्यात काय तर घर भाड्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर आता हमखास कर भरावा लागणार आहे.

सध्या नफा किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या शीर्षकाखाली घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न करापासून वाचवण्यात घर मालक यशस्वी होत आहेत. मात्र भविष्यात असे होणार नाही. घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न या प्रकारात घर भाड्याचे उत्पन्न दाखवावे लागणार असल्याने यासाठी कर भरावा लागणार आहे.

कधीपासून लागू होणार नवीन नियम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा केली आहे. मात्र याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही. याची अंमलबजावणी ही एक एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे.

नवीन नियमानुसार देखील करसुट मिळू शकते

या नवीन नियमातून देखील करदात्यांना सूट मिळू शकते. घरमालकांना घर भाड्याच्या उत्पन्नावर जर करसुट मिळवायचे असेल तर ते मालमत्तेच्या निव्वळ मूल्यावर स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत 30 टक्के कर वाचवू शकणार आहेत.

एवढेच नाही तर ज्या घरमालकांनी कर्ज घेऊन मालमत्ता खरेदी केली असेल किंवा घर बांधत असतील तर त्याची परतफेड करण्यासाठी द्याव्या लागणार्‍या व्याजामुळे हा कर आकारला जाणार नाहीये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe