Income Tax Rule : भारतीय आयकर विभागाने कर संदर्भात काही महत्त्वाचे नियम तयार केले आहेत. या नियमानुसार जरी तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीसुद्धा काही प्रकरणांमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावे लागतात.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कर प्रणालीनुसार अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आणि नव्या कर प्रणालीनुसार तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना सुद्धा काही प्रकरणांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावे लागतात.

आता आपण या संदर्भात भारतीय आयकर विभागाचे नियम काय आहेत आणि कोणत्या कॅटेगरी मधील लोकांना अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न किंवा तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असताना सुद्धा आयटीआर भरावा लागतो याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आयकर विभागाचे नियम काय सांगतात
एका लाखापेक्षा अधिकचे वीज बिल भरणारे लोक : या यादीत एका वर्षात एक लाख रुपये वीज बिल भरणाऱ्या लोकांचा समावेश होतो. भारतीय आयकर विभागाच्या नियमानुसार जे नागरिक एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपेक्षा अधिकचे वीज बिल भरतात अशा लोकांना आयटीआर फाईल करावा लागतो. वर्षाला एक लाख रुपये वीज बिल भरणाऱ्या लोकांचे उत्पन्न करपात्र नसेल तरीसुद्धा अशा प्रकरणांमध्ये त्यांना आयटीआर भरावा लागतो.
परदेश प्रवासादरम्यान दोन लाख रुपये खर्च करणारे लोक : जर तुम्ही परदेश प्रवासात दोन लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला असेल तर तुम्हाला अशा प्रकरणांमध्ये आयटीआर फाईल करावा लागतो. तुम्ही टुरिझमसाठी हा पैसा खर्च केला किंवा बिझनेस साठी हा पैसा खर्च केला याने काही फरक पडत नाही.
तुम्ही जर फॉरेन ट्रिप दरम्यान दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपये खर्च केले तर तुम्हाला आयटीआर भरावा लागतो. अशा परिस्थितीत तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीसुद्धा तुम्हाला आयटीआर द्यावाच लागेल.
करंट अकाउंट मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणारे लोक : भारतीय आयकर विभागाच्या नियमानुसार, जे लोक आपल्या करंट बँक अकाउंट मध्ये का आर्थिक वर्षात एक करोड रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करतात अशा लोकांना आयटीआर फाईल करावा लागतो. विशेष म्हणजे अशा लोकांचे उत्पन्न करपात्र नसेल तरीसुद्धा त्यांना आयटीआर द्यावाच लागणार आहे.