India Railway News : भारतात सुरुवातीला कोळशावर चालणारी रेल्वे धावली होती. यानंतर भारतीय रेल्वेमध्ये डिझेल इंजनाचा पर्याय आला. डिझेल इंजन नंतर रेल्वेमध्ये इलेक्ट्रिक रेल्वेचा पर्याय आला. अन आता हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुद्धा सुरु होणार आहे. देशात सध्या वंदे भारत ट्रेनची क्रेज आहे.
पण वंदे भारत ट्रेन नंतर आता देशात हायड्रोजन ट्रेन धावताना दिसणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होईल अशी आशा आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची ट्रायल रन नुकतीच सुरू झाली असून ही गाडी येत्या काही महिन्यांनी प्रत्यक्षात रुळावर धावताना दिसणार आहे.

या ट्रेनची ट्रायल रन सुरू झाली असल्याने ही गाडी प्रत्यक्षात रुळावर लवकरच दिसणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल. दरम्यान आता आपण ही गाडी देशातील कोणत्या मार्गावर धावणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असणार रूट?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हायड्रोजन ट्रेनची निर्मिती चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे होत असून ही गाडी जिंद ते सोनीपत या रेल्वे मार्गावर धावताना दिसण्याची शक्यता आहे.
ही गाडी 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार असून जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटर लांबीच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होईल. या ट्रेनमध्ये एकाच वेळी 2638 प्रवासी प्रवास करू शकतात ही ट्रेनची सर्वात मोठी विशेषता आहे.
या ट्रेनची ताकद बाराशे एचपी एवढी आहे. हायड्रोजन ट्रेन ही भारतातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत. सुरवातीला अशा प्रकारच्या 35 ट्रेन बनवल्या जाणार आहेत.
ही गाडी आठ कोच असणारी ट्रेन राहणार आहे आणि जगातील सर्वाधिक लांबीची हायड्रोजन ट्रेन म्हणून या गाडीला ओळखले जाईल. खरंतर भारतात सुरू होणारी हायड्रोजन ट्रेन याआधी देखील जगातील दुसऱ्या देशांमध्ये पाहायला मिळाली आहे.
सध्या जगातील चार महत्त्वाच्या देशांमध्ये हायड्रोजन ट्रेन सुरू आहे. मात्र जगात सुरू असणारे हायड्रोजन ट्रेन फक्त 500 ते 600 hp ची ताकद जनरेट करते.
दुसरीकडे भारतात जे हायड्रोजन ट्रेन सुरू होणार असेल तिची ताकद 1200 एचपी एवढी राहणार आहे. म्हणजेच जगात सुरू असणाऱ्या हायड्रोजन ट्रेनच्या तुलनेत भारतातील हायड्रोजन ट्रेनची ताकद अधिक राहणार आहे.
दरम्यान भारतात हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्यानंतर भारत हा देश हायड्रोजन ट्रेन चालवणारा पाचवा देश म्हणून उदयास येणार असून यामुळे भारतातील रेल्वेला एक नवी दिशा मिळणार आहे.