Indian Railway: रेल्वे प्रवास करण्याआधी वाचा! भारतातील सर्वात वेगवान, आरामदायी आणि स्वस्त ट्रेन कोणत्या?

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असून दररोज अडीच कोटींहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. केवळ प्रवासी वाहतुकीपुरतीच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलणारे हे प्रमुख वाहतुकीचे साधन आहे. रेल्वेमुळे देशाचा विकास वेगाने होत असून लाखो लोकांना रोजच्या रोजगाराची संधीही मिळते.

Published on -

Train In India:- भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असून दररोज अडीच कोटींहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. केवळ प्रवासी वाहतुकीपुरतीच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलणारे हे प्रमुख वाहतुकीचे साधन आहे. रेल्वेमुळे देशाचा विकास वेगाने होत असून लाखो लोकांना रोजच्या रोजगाराची संधीही मिळते.

भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेखा (लाईफलाईन) मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात किती प्रकारच्या ट्रेन धावतात? चला तर मग मंडळी रेल्वेचे प्रकार आणि वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया.

पॅसेंजर ट्रेन

विशेषतः लहान शहरं आणि गावे जोडणाऱ्या या ट्रेन कमी गतीने धावतात. बहुतांश डबे सामान्य श्रेणीचे असतात आणि तिकिटांचे दरही स्वस्त असतात. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी या ट्रेन अतिशय सोयीस्कर असतात.

एक्सप्रेस गाड्या

या ट्रेन तुलनेने जास्त वेगवान असतात आणि प्रमुख शहरांना जोडतात. एक्सप्रेस गाड्या काही ठराविक मोठ्या स्थानकांवरच थांबतात.त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी लवकर पोहोचता येते.

मेल-एक्स्प्रेस गाड्या

या प्रकारच्या ट्रेन साधारणपणे ५० किमी/तास वेगाने धावतात. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट दर एक्सप्रेसपेक्षा थोडे स्वस्त असतात. मेल ट्रेनमध्ये पूर्वी पत्रव्यवहार आणि टपाल वाहतूक केली जायची. त्यामुळे त्यांना मेल ट्रेन असे नाव पडले.

सुपरफास्ट ट्रेन

या ट्रेन सामान्य एक्सप्रेस आणि मेल ट्रेनच्या तुलनेत अधिक वेगवान असतात. त्यांचे तिकीट दर थोडे अधिक असतात कारण प्रवाशांचा वेळ वाचतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर यामध्ये आपल्याला राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस यासारख्या गाड्यांचा समावेश करता येईल.

लक्झरी ट्रेन

पर्यटकांसाठी खास डिझाइन केलेल्या या ट्रेनमध्ये राजेशाही आणि आलिशान सुविधा उपलब्ध असतात. हॉटेलसारख्या आरामदायी खोल्या, लक्झरी डायनिंग, टूर गाईड आणि इतर सुविधा दिल्या जातात. या प्रकारच्या ट्रेनचे उदाहरण घ्यायचे झाले तर पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी, महाराजा एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश यामध्ये होतो.

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेस

या भारतातील काही सर्वात वेगवान ट्रेन आहेत. राजधानी एक्सप्रेस राजधानी दिल्लीला देशातील प्रमुख शहरांशी जोडते. तर शताब्दी एक्सप्रेस मोठ्या शहरांमधील दिवसाच्या वेळेत जलद प्रवासासाठी आहे. दुरांतो एक्सप्रेस थोड्या कमी थांब्यांसह लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखली जाते.

मेट्रो आणि लोकल ट्रेन

मोठ्या शहरांमधील दैनंदिन प्रवासासाठी मेट्रो आणि लोकल ट्रेन अत्यंत उपयुक्त ठरतात. उदाहरण द्यायचे झाले तर..

मुंबई लोकल ट्रेन – देशातील सर्वात गर्दीच्या लोकल रेल्वे सेवांपैकी एक

दिल्ली मेट्रो – आधुनिक आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक,कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई मेट्रो – स्वच्छ आणि वेगवान प्रवास सुविधा

वंदे भारत एक्सप्रेस

ही भारताची पहिली सेमी-हायस्पीड ट्रेन असून ती अधिकतम १६० किमी/तास वेगाने धावू शकते. या ट्रेनमध्ये वायफाय, मॉडर्न सीटिंग, बायो-टॉयलेट, ऑटोमॅटिक दरवाजे आणि अन्य आधुनिक सुविधा आहेत.

मालगाड्या

फक्त मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या गाड्या कोळसा, अन्नधान्य, तेल, वीजेची उपकरणे आणि अन्य औद्योगिक वस्तू वाहून नेण्यासाठी वापरल्या जातात. मालगाड्यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो.

विशेष ट्रेन

भारतात सण, यात्रा, पर्यटन आणि अन्य विशेष प्रसंगी रेल्वे अतिरिक्त विशेष ट्रेन चालवते. उदा. कुंभमेळा, दिवाळी, होळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात रेल्वे अधिक विशेष गाड्या चालवते.

देशाच्या विकासात योगदान

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन सेवा पुरवते. पॅसेंजर ट्रेनपासून सुपरफास्ट एक्सप्रेसपर्यंत आणि लक्झरी पर्यटन ट्रेनपासून लोकल-मेट्रो ट्रेनपर्यंत भारतात प्रवाशांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे भारतीय रेल्वे फक्त वाहतुकीचे साधन नसून देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe