एसटीप्रमाणे आता रेल्वेने सुद्धा मोफत प्रवास करता येणार…..! ‘या’ लोकांना मिळणार फ्री पास, वाचा सविस्तर

Published on -

Indian Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करायचा असल्यास रेल्वेला प्राधान्य दिले जाते. कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचे कनेक्टिव्हिटी फार मोठी आहे.

देशाच्या कोणत्याही कोपऱ्याला आपण रेल्वेने सहज पोहोचू शकतो. दरम्यान रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा नेहमीच अधिक राहिली आहे. ज्या भागांमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी नसते अशा ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस अर्थात लालपरी आपल्याला पाहायला मिळतात.

महाराष्ट्रात तर लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारकडून काही सवलत सुद्धा दिली जात आहे. महिलांना तिकीट दरात 50% अन जेष्ठ नागरिकांना 100% सवलत दिली जात आहे.

दरम्यान आता रेल्वे मध्ये पण तिकीट दरात 100% सवलत दिली जाणार आहे. रेल्वे भरती मंडळाकडून (RRB) घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक ग्रुप डी परीक्षा आजपासून सुरु झाली आहे, म्हणजेच 27 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली आहे.

तसेच ही परीक्षा 16 जानेवारी 2026 पर्यंत देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. लाखो उमेदवार या परीक्षेत सहभागी होत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी प्रवेशपत्रे (Admit Card) आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून उमेदवारांना ती वेळेत डाउनलोड करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. दरम्यान या परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत मोफत प्रवास करता येणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी मोफत रेल्वे प्रवास

परीक्षेसाठी दूरवरून प्रवास करणाऱ्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी रेल्वे प्रशासनाने मोफत स्लीपर क्लास प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सवलत फक्त परीक्षेसाठीच असल्याने इतर प्रवर्गातील General/OBC/EWS उमेदवारांना याचा लाभ मिळणार नाही.

SC/ST उमेदवारांना CBT, PET किंवा Document Verification या कोणत्याही टप्प्यासाठी ई-कॉल लेटरसोबतच फ्री ट्रॅव्हल पास डाउनलोड करता येणार आहे. हा पास उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या बोर्डिंग स्टेशनपासून परीक्षा केंद्राच्या जवळील रेल्वे स्टेशनपर्यंतच वैध असेल. या मर्यादेबाहेर प्रवास केल्यास नियमांनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कागदपत्रांची अनिवार्य तपासणी

प्रवासादरम्यान उमेदवाराकडे मूळ जात प्रमाणपत्र, ई-कॉल लेटर आणि मोफत पास असणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र नसल्यास किंवा खोटे असल्यास उमेदवारास प्रवाससवलत नाकारली जाईलच, शिवाय परीक्षेलाही बसू दिले जाणार नाही.

दंडात्मक कारवाईची तरतूद

अर्ज भरताना चुकीचे बोर्डिंग स्टेशन निवडल्यास दिलेला पास वैध ठरणार नाही. तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतलेला प्रवास उघडकीस आल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

दरम्यान, रेल्वेने सर्व SC/ST उमेदवारांना वेळेत आणि नियमानुसार प्रवास करून परीक्षा केंद्र गाठण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेच्या प्रचंड प्रमाणामुळे प्रशासनाने उमेदवारांना वेळेत केंद्रात पोहोचण्याचे विशेष आवाहन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe