Indian Railway Rule 2023 : भारतात प्रवासासाठी प्रवाशी नेहमीच रेल्वेला पसंती दाखवतात. रेल्वेचा प्रवास हा अधिक सोयीचा आणि सुरक्षित समजला जातो. रेल्वे प्रवासाला पसंती देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच कमी दरात होतो.
याशिवाय लांब अंतरावरील प्रवास कमी वेळेत होतो. यासोबतच भारतीय रेल्वेचे जाळे हे खूप मोठे आहे. रेल्वे ही देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेली आहे.
यामुळे रेल्वेतून प्रवास करणे सर्वात सोयीचे आणि प्रवाशांच्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहे. मात्र भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही नियमांचे देखील भान ठेवून प्रवास करावा लागतो.
हे पण वाचा :- रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा सविस्तर
अन्यथा रेल्वे प्रवाशांना मोठा दंड देखील भरावा लागू शकतो. दरम्यान आज आपण भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीटा संदर्भात तयार केलेले काही नियम जाणून घेणार आहोत. जर प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन केले तर तिकीट काढलेले असताना देखील प्रवाशांना दंड भरावा लागू शकतो.
जर प्रवाशांनी रेल्वेचे तिकीट काढले आहे मात्र रेल्वे प्रवासी प्लॅटफॉर्मवर फिरत आहे तर प्रवाशांना दंड भरावा लागू शकतो. एवढेच नाही तर प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहण्यासाठी देखील काही नियम आहेत. याचे देखील पालन प्रवाशांनी केले नाही तर मोठा दंड प्रवाशांकडून वसूल केला जातो.
हे पण वाचा :- आठवी पास तरुणांसाठी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्टात ‘या’ पदासाठी निघाली भरती, मिळणार ‘इतकं’ वेतन, पहा डिटेल्स
काय आहे नियम
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार जर तुम्ही रेल्वेने दिवसा प्रवास करत असाल तर तुमची ट्रेन ज्यावेळी आहे त्यापेक्षा दोन तास आधी प्लॅटफॉर्मवर पोहचू शकता. तसेच जर रात्रीची ट्रेन असेल तर आपण सहा तास आधी प्लॅटफॉर्मवर पोचू शकता. असे केल्यास आपल्याकडून कोणताच दंड आकारला जाणार नाही.
हाच सेम नियम रेल्वेमधून उतरल्यानंतरही लागू होतो जर आपण दिवसा रेल्वेमधून प्रवास करून उत्तरले तर दोन तास प्लॅटफॉर्मवर थांबू शकता आणि रात्री सहा तास प्लॅटफॉर्मवर थांबू शकता. यासाठी मात्र तुमचे प्रवासाचे तिकीट तुमच्या जवळ बाळगावे लागणार आहे. तुमच्याकडे तिकीट नसल्यास टीटी तुमच्याकडून दंड आकारू शकतो.
केव्हा लागतो दंड
रेल्वेच्या नियमा नुसार, जर तुम्ही दिवसा ट्रेनच्या वेळेपासून 2 तासांपेक्षा जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर थांबत असाल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागणार आहे आणि रात्री ट्रेनच्या वेळेपासून 6 तासांपेक्षा जास्त वेळ थांबलात तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल. अन्यथा टीटी तुमच्याकडून दंड आकारू शकतो. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट देखील फक्त दोन तासात पुरतेच मर्यादित असते.
म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट काढल्यानंतर दोन तास आपण प्लॅटफॉर्मवर थांबू शकता यानंतर प्लॅटफॉर्म तिकीटची वैधता संपुष्टात येते. यामुळे जर प्लॅटफॉर्म तिकीट काढून तुम्ही दोन तासापेक्षा अधिक वेळ प्लॅटफॉर्मवर असाल तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो.