Post Office : होणार फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेचे वाढले व्याजदर, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच यात परतावाही सर्वोत्तम मिळतो. त्यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीला प्राधान्य देत असतात.

अशीच एक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे. तुम्ही या सुपरहिट योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करून प्रत्येक महिन्याला हमी उत्पन्न मिळवू शकता. आता या पोस्ट ऑफिसच्या योजनेचे व्याजदर वाढले आहे. त्यामुळे फायदाच फायदा होणार आहे. कसे ते जाणून घ्या सविस्तर.

पोस्ट ऑफिसच्या POMIS मध्ये गुंतवणुकीची मर्यादा 4 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये केली आहे. तसेच संयुक्त खातेदारांसाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपये इतकी केली आहे. जे या पूर्वी ते 9 लाख रुपयांपर्यंत होते. त्यामुळे आता गुंतवणूकदारांना या योजनेत जास्तीत जास्त नफा मिळवता येईल.

जाणून घ्या व्याज दर

या योजनेतील गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याज दिले जात आहे, सरकारकडून दर तीन महिन्यांला व्याजदरात सुधारणा करण्यात येते. या जानेवारी ते मार्चपर्यंत 7.1 टक्के व्याजावर गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये निश्चित केली आहे.

त्यामुळे जर तुम्ही या योजनेत खाते उघडण्याच्या विचारात असल्यास तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असावीत. ज्यांच्यासोबत तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सहज फॉर्म सबमिट करता येईल. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये खाते चालू करून फॉर्मसह EKYC फॉर्म सबमिट करावा लागणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत खाते उघडल्यापासून ते मुदतपूर्तीपर्यंत प्रत्येक महिन्याला व्याजाचे पैसे देण्यात येतात. जर खातेदाराने जास्त पैसे जमा केल्यास त्या जादा रकमेवरच व्याजदर लागू होतो. तसेच या योजनेतील व्याज उत्पन्न करपात्र असते.

जर या योजनेच्या मॅच्युरिटीबद्दल सांगायची झाल्यास तर ती 5 वर्षात परिपक्व होते. तुम्हाला ठेवीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी या योजनेत कोणतीही ठेव काढता येत नाही. जर तुम्ही खाते 1 वर्षानंतर परंतु 3 वर्षापूर्वी बंद केल्यास 2% मुद्दल कापून उर्वरित रक्कम तुम्हाला देण्यात येईल. जर तुम्ही 3 वर्षांनंतर खाते बंद केले तर, ठेवीतील 1% कपात करून तुम्हाला शिल्लक रक्कम दिली जाईल.