‘हे’ आहेत देशातील सगळ्यात स्वच्छ आणि हायटेक टॉप 7 रेल्वे स्थानक ! एअरपोर्टसारख्या सुविधा मिळणार वाचा सविस्तर…

भारतात हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे नेटवर्क आहे. या हजारो किलोमीटर लांबीच्या रेल्वे नेटवर्क हजारो रेल्वे स्थानके आहेत. देशात एकूण 7500 रेल्वे स्थानक असल्याचे आकडेवारी समोर आली असून यापैकी आज आपण सात अशा रेल्वे स्थानकांची माहिती जाणून घेणार आहोत जे की देशातील सर्वाधिक हायटेक रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जातात.

Published on -

Indian Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. देशातील रेल्वेचे नेटवर्क हे फारच विस्तृत आहे. भारतात आता विकसित देशांप्रमाणे रेल्वेचे एक लॉंग आणि अगदीच स्ट्रॉंग नेटवर्क तर आहेच शिवाय भारतात विविध हाय स्पीड ट्रेन देखील सुरू आहेत.

तेजस शताब्दी वंदे भारत एक्सप्रेस अशा हाय स्पीड एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. खरंतर भारतात रेल्वेचे नेटवर्क हे विस्तृत असल्याने आणि रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की देशात एकूण सात हजार पाचशे रेल्वे स्टेशन आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या हजारो रेल्वे स्थानकांपैकी आज आपण अशा सात रेल्वे स्थानकांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे प्रवाशांना अगदीच एअरपोर्ट प्रमाणे सोयी सुविधा मिळतात. या रेल्वेस्थानकांवर जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा तर आहेतच शिवाय येथील स्वच्छता आणि ऍटमॉस्फेअर फारच नीट आणि क्लीन आहे.

हे रेल्वे स्थानक आहेत देशातील सर्वाधिक हायटेक रेल्वे स्थानक

विजयवाड़ा : असं म्हणतात की आंध्र प्रदेशातील विजयवाड़ा रेल्वे स्टेशन हे फारच हायटेक आहे. हे Railway Station ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. तसेच हे स्वच्छतेच्या बाबतीतही उत्तम मानले जाते. या रेल्वे स्थानकावर अगदीच एअरपोर्ट सारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

हरिद्वार रेल्वे स्टेशन : उत्तराखंडमधील हरिद्वार रेल्वे स्टेशन सुद्धा भारतातील एक सुंदर रेल्वे स्थानक आहे. हरिद्वार हे देशातील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे स्थानकही स्वच्छतेच्या यादीत अग्रगण्य असल्याचे बोलले जात आहे.

राणी कमलापती : राणी कमलापती रेल्वे स्थानक हे भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्थानक असून देशातील सर्वाधिक स्वच्छ आणि हायटेक रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. मध्य प्रदेशातील राणी कमलापती स्टेशन आपल्या एअरपोर्टसदृश देखण्या रचनेमुळे खास ओळखले जाते.

ही स्थानके पण कमी नाहीत

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राजस्थानमधील जयपूर, जोधपूर आणि दुर्गापूर ही स्थानकेही अत्यंत स्वच्छ आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. यातील राजस्थान राज्यातील जयपूर रेल्वे स्थानकाची रचना आणि देखभाल प्रशंसनीय असल्याचे बोलले जात आहे.

जोधपूरचे स्थानक ‘ब्लू सिटी’ प्रमाणेच स्वच्छतेने नटलेले आहे. याशिवाय, जम्मू तवी रेल्वे स्टेशन सुद्धा असंच एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे जम्मू काश्मीरचे प्रवेशद्वार मानले जाते आणि वैष्णो देवी यात्रेसाठी प्रमुख ठिकाण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News