Indian Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. कारण म्हणजे देशातील रेल्वे नेटवर्क हे फारच मोठे आहे आणि रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा सुद्धा आहे. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेमुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जलद गतीने पोहोचता येणे आणि शक्य झाले आहे.
यामुळे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाली आहे. रेल्वेमुळे देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळत असून अर्थव्यवस्थेत रेल्वेचे योगदान मोठे उल्लेखनीय आहे. खरे तर भारतीय रेल्वे बाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या की नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

दरम्यान जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर आज आपण भारतीय रेल्वेच्या अशाच एका आश्चर्यकारक गोष्टीची माहिती पाहणार आहोत. आज आपण भारतातील सर्वात छोट आणि मोठं नाव असणाऱ्या रेल्वेस्थानकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे आहे भारतातील सर्वात छोट नाव असणारे रेल्वे स्थानक
भारतातील एका रेल्वे स्थानकाचे नाव फक्त दोन अक्षरी असून हे सर्वात छोटे नाव असणारे देशातील एकमात्र रेल्वे स्थानक असल्याचा दावा केला जातो. भारतातील सर्वात लहान नावाचे रेल्वे स्टेशन ओडिशा राज्यात स्थित असल्याची माहिती जाणकार लोकांकडून प्राप्त झाली आहे. ओडिशा राज्यात स्थित असणाऱ्या या स्टेशनचे नाव फक्त आयबी असे आहे.
मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे ज्याचे नाव सर्वात लहान आहे. दरम्यान या रेल्वेस्थानकाचे दोन अक्षरी नाव हेच एक मोठे कारण आहे जे की या रेल्वे स्टेशनला फारच खास बनवते आणि या रेल्वे स्थानकाची नेहमीच चर्चा होत असते.
सर्वात मोठ नाव असणार रेल्वे स्थानक
IB हे भारतातील सर्वात छोट नाव असणारे रेल्वे स्थानक असून दुसरीकडे, आंध्रप्रदेश मधील एका रेल्वे स्थानकाचे नाव फारच मोठे आहे. भारतातील सर्वात मोठ्या नावाच्या रेल्वे स्टेशनबद्दल बोलायच झालं तर त्याचे नाव वेंकटनरसिंहराजुवरीपेटा असे आहे जे की आंध्रप्रदेश या राज्यात स्थित आहे.
हे रेल्वे स्टेशन तामिळनाडूच्या सीमेजवळच आहे. या रेल्वे स्टेशनच्या नावामुळेच हे रेल्वे स्थानक विशेष प्रसिद्ध आहे. हे स्थानक देशातील सर्वात मोठे नाव असलेले स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकाच्या नावामुळेच या स्थानकाची नेहमीच मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते.
देशातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे स्टेशन कोणते?
देशात जवळपास साडेसात हजार रेल्वे स्थानक आहेत. या रेल्वेस्थानकांपैकी उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील रेल्वे स्थानक हे सर्वाधिक लांबीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी सुमारे 1366 मीटर इतकी असल्याचा दावा केला जातो.
दुसरीकडे आपण भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशनचा विचार केला तर ते आंध्र प्रदेशात आहे. गुंटूर जिल्ह्यातील पेनुमुरु रेल्वे स्टेशन हे देशातील सर्वात छोट रेल्वे स्थानक म्हणून ओळखल जात. मिळालेल्या माहितीनुसार देशातील या सर्वात छोट्या रेल्वे स्थानकावर एकही प्लॅटफॉर्म नाही.