India’s Corrupt Government Department : भ्रष्टाचार हा कोणत्याही देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा असतो. भ्रष्टाचारामुळे अनेक देशांचे दिवाळे निघाले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश. आपल्या देशाचे अर्थव्यवस्था नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे अर्थव्यवस्था होती मात्र आता देशाचे अर्थव्यवस्था जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे लवकरात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची होईल असा विश्वास अर्थ तज्ञांकडून व्यक्त केला जातोय. मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा होतोय. भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्यांना आवश्यक सोयी सुविधा मिळत नाहीत. आयकर दात्यांच्या पैशांचा योग्य वापर होत नाही.

म्हणूनच देशाचा विकास ज्या गतीने झाला पाहिजे तो होत नाही. दरम्यान, आज आपण भारतातील सर्वाधिक करप्ट खात्यांची माहिती पाहणार आहोत. भारतातील कोणत्या सरकारी खात्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होतो, टॉप 10 भ्रष्ट खाते कोणती ? याची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत.
ही आहेत भारतातील सर्वाधिक भ्रष्ट टॉप 10 विभाग
आयकर विभाग : भारतातील आयकर विभाग हा देशातील सर्वाधिक भ्रष्ट विभागांमध्ये दहाव्या क्रमांकावर येतो. मीडिया रिपोर्टनुसार आयकर विभागातील कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर छापे, बनावट रिटर्न, व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली टाळण्यासाठी भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप आहे.
गृहनिर्माण आणि नगर विकास विभाग : हा सरकारी विभाग या यादीत नवव्या क्रमांकावर येतो. या विभागातील कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर बांधकाम करार, निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
शिक्षण विभाग : भारतात शिक्षण क्षेत्रात देखील मोठा भ्रष्टाचार होतो. म्हणूनच देशातील सर्वाधिक भ्रष्ट विभागांमध्ये शिक्षण विभागाचा आठवा क्रमांक आहे. शिक्षक भरतीत घोटाळा, शाळेत शिक्षकांची बनावट उपस्थिती, खाजगी शाळांशी संगनमत करून या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप आहे.
सरकारी रुग्णालय / आरोग्य विभाग : देशातील सर्वाधिक भ्रष्ट विभागांमध्ये सरकारी रुग्णालय तसेच आरोग्य विभागाचा सातवा क्रमांक लागतो. या विभागावर औषध पुरवठ्यात भ्रष्टाचार, डॉक्टरांची अनुपस्थिती, ऑपरेशनसाठी खाजगी रुग्णालयात पाठवणे, अनावश्यक महागडी औषधे लिहून मेडिकल स्टोअरमधून कमिशन देणे अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे.
रस्ते वाहतूक विभाग – आरटीओ : हा सरकारी विभाग देशातील सर्वाधिक भ्रष्ट विभागांमध्ये सहाव्या क्रमांकावर येतो. लायसन्स, वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्रमध्ये नागरिकांकडून किंवा थर्ड पार्टीकडून लाच घेतली जाते असा आरोप या विभागावर सुद्धा आहे.
वीज विभाग : देशातील सर्वाधिक भ्रष्ट विभागांमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो वीज विभाग. मीटर रीडिंगमध्ये छेडछाड, बनावट बिलिंग, कनेक्शनमध्ये विलंब, कनेक्शनमध्ये बिघाड झाल्यास लाच अशा प्रकारचा भ्रष्टाचार या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात होतो असा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत : ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो आणि म्हणूनच हा विभाग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय योजना, रेशनकार्ड अनियमितता, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, विधवा पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करण्यात येतो.
महानगरपालिका / नगरपालिका : देशातील सर्वाधिक भ्रष्ट विभागांच्या यादीत हा विभाग तिसऱ्या क्रमांकावर येतो. इमारतीचा नकाशा पास करण्यासाठी लाच घेणे, बेकायदेशीर बांधकामांसाठी लाच घेणे असे आरोप या विभागातील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर केले जातात.
महसूल विभाग : या यादीत महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर येतो. महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून विविध कामांसाठी लाच घेतली जाते असा आरोप केला जातो.
पोलीस विभाग : देशातील सर्वाधिक भ्रष्ट विभागांच्या यादीत पोलीस विभाग पहिल्यानंबर वर आहे. पोलिसी खाकीचा धाक दाखवून सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असल्याचा आरोप केला जातो. पोलीस प्रशासनात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात लाच घेतात आणि यामुळे हा विभाग सर्वाधिक भ्रष्ट विभाग म्हणून पहिल्या क्रमांकावर येतो.