India’s Costly Lawyer : कोर्ट आणि दवाखाना यांची पायरी चुकूनही चढू नये असे म्हणतात. कारण म्हणजे न्यायालय तसेच दवाखान्यात मोठा पैसा खर्च करावा लागतो. कोर्टात प्रकरण पोहोचला की वकील लावावा लावतो. वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात याचिकाकर्त्याच्या माध्यमातून युक्तिवाद केला जातो.
दरम्यान आज आपण देशातील अशा काही वकिलांची माहिती जाणून घेणार आहोत जे की लाखोंच्या घरात फि वसूल करतात. आज आपण एका प्रकरणासाठी सर्वाधिक शुल्क वसूल करणारे वकील कोणते आहेत याची माहिती पाहणार आहोत.

हे आहेत देशातील सर्वात महागडे वकील
अभिषेक मनु सिंघवी – या यादीत वकील सिंघवी टॉपला येतात असं आपण म्हणू शकतो. सिंघवी अनेक राजकीय नेत्यांच्या केसेस लढवतात. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केस सुद्धा सिंघवी यांच्याकडेच होती.
महत्त्वाची बाब म्हणजे ह्या प्रकरणात त्यांनी केजरीवाल यांना जामीन मिळवून दिला. यामुळे सिंघवी यांची जोरदार चर्चा सुद्धा झाली होती. सिंघवी आपल्या एका केससाठी साधारणतः 15 ते 30 लाख रुपयांची फी घेतात.
हरीश साळवे – यादीत हरीश साळवे यांचा पहिला नंबर लागतो. ते देशातील सर्वात महागडे वकील आहेत. ते एका केससाठी जवळपास दहा लाखांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत फि वसूल करतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुप्तहेर कुलभूषण जाधव यांची बाजू लावून धरली होती. सबरीमाला मंदिर प्रकरणात देखील हरीश साळवे यांनी बाजू मांडली होती.
मुकुल रोहतगी – हे सुद्धा देशातील सर्वाधिक महागड्या वकिलांच्या यादीत. त्यांनी शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याची केस लढवली होती. अंमलीपदार्थ प्रकरणात आर्यन खान चांगलाच बसला होता मात्र त्यांनी यातून त्याला यशस्वीपणे जामीन मिळवून दिला. रोहतगी एका केस साठी 10 ते 20 लाख रुपयांची फी घेतात अशी माहिती समोर आली आहे.
फली एस. नरीमन – या यादीत नरीमन सुद्धा येतात. ते त्यांच्या प्रत्येक केससाठी 8 ते 15 लाख रुपयांची फी आकारतात अशी माहिती काही रिपोर्ट मधून पुढे आली आहे.