भारतातील ‘या’ 5 ठिकाणी मिळतात देशातील सर्वाधिक महाग घरे ! आयुष्यभर नोकरी केली तरी देखील घराचे स्वप्न पूर्ण होणार नाही

सर्वसामान्य नागरिक घर खरेदीसाठी आपल्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी खर्ची करतात. मात्र आज आपण देशातील अशा टॉप पाच ठिकाणांची माहिती पाहणार आहोत जिथे सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी खर्ची केली, संपूर्ण आयुष्यभर नोकरी केली तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी घर खरेदी करता येणार नाही.

Published on -

India’s Expensive Area : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न असेल. मात्र घराचे स्वप्न अलीकडे फारच महाग बनले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये घर खरेदी करणे म्हणजेच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट बनली आहे.

देशातील प्रमुख महानगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी आणि आपल्या बजेटमध्ये घर शोधणे ही फारच अवघड बाब आहे. दरम्यान आज आपण अशा काही ठिकाणांची माहिती पाहणार आहोत जिथे घरांची किंमत फारच अधिक आहे. जर सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यभर नोकरी केली तरी देखील या ठिकाणी त्यांना घर खरेदी करता येणे अशक्य आहे.

हे आहे देशातील सर्वाधिक महाग टॉप 5 ठिकाण

हैदराबादमधील बंजारा हिल्स : या यादीत हैदराबाद मधील बंजारा हिल्स पाचव्या क्रमांकावर येते. हैदराबादमधील बंजारा हिल्स हा एक पॉश एरिया म्हणून ओळखला जातो. जाणकार लोक सांगतात की हैदराबाद शहरातील हा परिसर केवळ हैदराबादचा नाही तर दक्षिण भारतातील सर्वात महागडा आणि उच्चभ्रू परिसर मानला जातो.

येथे व्यवसाय आणि चित्रपट जगतातील बहुतेक लोक वास्तव्याला असल्याने या ठिकाणी घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. बंजारा हिल्स मध्ये सर्वसामान्य नोकरी करणाऱ्यांना घर घेणे अशक्यच आहे.

दिल्लीचा जोर बाग : देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत देखील असे काही प्राईम लोकेशन आहे तर जिथे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे जवळपास अशक्य आहे. जोर बाग हा दिल्लीचा सर्वाधिक महागडा आणि पॉश एरिया असून या यादीत हा परिसर चौथ्या क्रमांकावर येतो.

येथील घरांच्या किमती फारच अधिक आहेत. सफदरजंग आणि लोधी गार्डन जवळील हा परिसर फारच उच्चभ्रू आहे. जोर बागमध्ये जमीनचे रेट सोन्यापेक्षा महाग आहेत. देशातील बहुतेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी याच भागात राहतात अशी माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील गोल्फ लिंक्स : दिल्लीतील हा आणखी एक परिसर सर्वाधिक महागडा परिसर म्हणून ओळखला जातो. या यादीत दिल्लीमधील हे ठिकाण तिसऱ्या क्रमांकावर येते. दिल्लीतील गोल्फ लिंक्स क्षेत्र, जे की इंडिया गेटजवळ आहे आणि येथील जमिनीच्या आणि घरांच्या किमती देखील आकाशाला गवस निघालात आहेत. हा परिसर येथील हिरवळ, शांतता आणि सुरक्षितता यासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. 

मुंबईतील मलबार हिल : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील मलबार हिल हा भारतातील सर्वात पॉश एरियांपैकी एक एरिया आहे. हा एरिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी घर घेणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर आहे. हा परिसर अरबी समुद्राच्या काठावर वसलेला आहे. या ठिकाणी अनेक श्रीमंत लोकांच्या सदनिका पाहायला मिळतात.

अल्टामाउंट रोड, मुंबई : मुंबईमधील अल्टामाउंट रोड हा देशातील सर्वाधिक पॉश एरिया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी घरांच्या किमती सर्वात जास्त आहेत म्हणूनच या यादीत हे ठिकाण पहिल्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी तुम्हाला बहुतांशी अब्जाधीश लोक पाहायला मिळतात.

भारतातील तसेच आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे घर सुद्धा याच भागात आहे. समुद्रासमोरील टॉवर आणि हेरिटेज बंगले हे या भागाची एक मोठी विशेषता आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!