‘ही’ आहेत देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे ! पहिल्या नंबरवर कोणत शहर ?

भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाची पहिली 10 शहरे कोणती ? याची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. या यादीत महाराष्ट्रातील किती शहरे समाविष्ट आहेत ? याची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

Published on -

India’s Largest City : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठी पाचव्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. काही अहवालातून देशातील अर्थव्यवस्था चौथ्या नंबर वर पोहोचली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

आपल्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत चौथा नंबर पटकावला असल्याचा अहवाल समोर येतोय. तर दुसरीकडे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असा सुद्धा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान आज आपण देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका निभावणाऱ्या शहरांची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरें कोणती आहेत ? याची माहिती पाहणार आहोत. 

देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे कोणती ? 

सुरत : क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक मोठ्या शहरांच्या यादीत सुरत या शहराचा 10वा नंबर लागतो. या शहराचे क्षेत्रफळ 462 चौरस किलोमीटर इतके आहे. हे शहर टेक्सटाइल हब आणि डायमंड हब म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते. गुजरातच्या विकासात सुरतचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. 

भोपाळ : देशातील सर्वाधिक मोठ्या शहरांच्या यादीत मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या शहराचा 9 वा नंबर लागतो. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 463 चौरस किलोमीटर इतके आहे. 

अहमदाबाद : गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहराचा या यादीत आठवा नंबर लागतो. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 505 चौरस किलोमीटर इतके आहे. 

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अन शिक्षणाचे माहेरघर पुणे सुद्धा या यादीत येते. या यादीत पुण्याचा सातवा नंबर लागतो. मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहराचे एकूण क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर इतके आहे. महत्त्वाची बाब अशी की या यादीत महाराष्ट्रातील फक्त एकच शहराचा समावेश आहे आणि ते म्हणजे पुणे. 

इंदोर : मध्य प्रदेशातील इंदोर या शहराचा या यादीत सहावा नंबर लागतो. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 530 चौरस किलोमीटर इतके आहे.

लखनऊ : देशातील सर्वात मोठे राज्य म्हणजेच उत्तर प्रदेशमधील लखनऊ या शहराचा या यादीत पाचवा नंबर लागतो. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 631 चौरस मीटर इतके आहे. 

हैदराबाद : हैदराबाद शहराचा या यादीत चौथा नंबर लागतो. तेलंगणा राज्यातील हैदराबाद या शहराचे एकूण क्षेत्रफळ 650 चौरस किलोमीटर इतके आहे. 

विशाखापटनम : विशाखापटनम हे देशातील सर्वाधिक मोठ्या शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 682 चौरस किलोमीटर इतके आहे.

बेंगलोर : कर्नाटक राज्यातील बंगलोर हे देशातील सर्वाधिक मोठ्या शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 741 चौरस किलोमीटर इतके आहे.

दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली हे या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे शहर म्हणजेच दिल्ली. दिल्लीचे एकूण क्षेत्रफळ 1,484 चौरस किलोमीटर इतके आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!