India’s Largest District : भारतात साधारणतः 780 ते 800 जिल्हे आहेत. 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे जिल्हे आहेत. देशात अनेक मोठमोठे जिल्हे आहेत. दरम्यान आज आपण अशा एका जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत जो की काही राज्यांपेक्षाही मोठा आहे.
देशातील एका बड्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे काही राज्यांपेक्षा अधिक असल्याने हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. भारतात राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असून यात एकूण पन्नास जिल्हे आहेत. तसेच उत्तर प्रदेश राज्यात एकूण 75 जिल्हे आहेत.

देशातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे काही राज्यांपेक्षा अधिक आहे. राज्य चालवण्यासाठी मुख्यमंत्री तसेच अनेक प्रशासक असतात मात्र या जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी फक्त जिल्हा अधिकारीच असतात.
नक्कीच आता तुम्हाला देशातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्याची माहिती जाणून घ्यायची असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
अनेकांना भारतातील सर्वाधिक मोठा जिल्हा उत्तर प्रदेश राजस्थान किंवा मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये असेल असे वाटत असेल. पण भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा हा महाराष्ट्र शेजारील गुजरात राज्यात आहे.
गुजरात मधील कच्छ हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पश्चिम भारतातील गुजरात राज्यातील “कच्छ” हा जिल्हा गोव्यापेक्षा मोठा आहे. याला भारताचा सर्वात मोठा जिल्हा म्हणतात. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 45 हजार 674 चौरस किलोमीटर इतके आहे.
जे की हरियाणा, केरळ, दिल्ली आणि गोवा या राज्यांपेक्षा अधिक आहे. म्हणजे हरियाणा, केरळ आणि गोव्यापेक्षा कच्छ हा जिल्हा अधिक मोठा आहे. जाणकार आम्ही दिलेल्या माहितीनुसार हरियाणा राज्याचे क्षेत्रफळ 44,212 चौ.किमी आहे. तर केरळ राज्याचे क्षेत्रफळ 38,863 चौ.किमी आहे.
गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3,702 चौ.किमी आणि दिल्लीचे एकूण क्षेत्रफळ 1,484 चौ.किमी आहे. म्हणजेच पश्चिम भारतातील गुजरात राज्यातला हा जिल्हा दिल्लीपेक्षा 31 पट मोठा आहे.
गोव्यासोबत तुलना केली तर हा जिल्हा बारापट मोठा आहे. गुजरातच्या एकूण भूभागापैकी जवळपास 23% हिस्सा फक्त कच्छ जिल्ह्यातला असल्याची माहिती रेकॉर्ड मधून समोर आली आहे.













