India’s Longest Ropeway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 30 हुन अधिक रोपवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. पुणे, नगर आणि नाशिक मध्ये देखील अनेक ठिकाणी रोपवे निर्माण केले जाणार आहेत. अशातच आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे जगातील सर्वाधिक लांबीचा रोपवे प्रकल्प आपल्या भारतात तयार होणार आहे.
हा प्रकल्प हिमाचल प्रदेश मध्ये तयार होणार आहे. हिमाचल प्रदेश हे देशातील एक हॉट टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. संपूर्ण देशभरातून लोक येथे पिकनिक साठी येतात. जगातील इतर देशांमधूनही या ठिकाणी पिकनिक साठी येणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.

यामुळे हिमाचल प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते. शिमला ते परवानु या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. रस्ते मार्गाने शिमला ते परवानू हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास दोन ते तीन तासांचा वेळ खर्च करावा लागतो.
हेच कारण आहे की आता शिमला ते परवानु दरम्यान रोपवे तयार केला जाणार आहे. हा रोपवे 40.73 किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. शिमला ते परवानु हे अंतर रस्ते मार्गे ८० किलोमीटरचे आहे.
मात्र शिमला ते परवानु या दरम्यान 40.73 किलोमीटर लांबीचा रोपवे तयार होईल. खरेतर, सध्या सोलन जिल्ह्यातील परवाणू येथून शिमलाला रस्त्याने जाण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागतात. मात्र रोपवे झाल्यास प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे रोपवेने प्रत्येक तासाला दोन हजार प्रवासी प्रवास करू शकता. या प्रकल्पासाठी जवळपास 5 हजार 600 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या प्रस्तावित रोपवे मार्गावर शिमला आणि परवाणू दरम्यान 11 स्थानके असतील. सुरुवातीच्या अंदाजानुसार, ते प्रत्येक दिशेने प्रति तास 904 प्रवासी वाहून नेऊ शकते.
म्हणजे दोन्ही बाजूंनी सुमारे 2 हजार लोक प्रवास करू शकतील. एका रोपवे केबिनमध्ये 9-10 प्रवासी बसतील. यामुळे वाहतूक कोंडी तर सुटणारच आहे शिवाय पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. यामुळे हा प्रकल्प हिमाचल प्रदेशसाठी फारच महत्त्वाचा ठरणार आहे.