India’s Richest City : भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताने जपानला मागे टाकत हा बहुमान पटकावलाय.
पण तुम्हाला देशातील टॉप 10 श्रीमंत शहरांची नावे माहिती आहेत का? नाही ना मग आज आपण याचीच माहिती पाहणार आहोत. देशातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणकोणत्या शहरांचा समावेश होतो? याबाबतही आता आपण डिटेल माहिती पाहूयात.

भारतातील टॉप 10 श्रीमंत शहरे
1) मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहर आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण देशाच्या एकूण जीडीपी पैकी 6.16% वाटा मुंबईचा आहे. मुंबईची जीडीपी 310 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
यामुळे हे देशातील सर्वाधिक श्रीमंत शहर आहे. या शहराला बॉलीवूडनगरी, मायानगरी अन स्वप्न नगरी म्हणूनही ओळखले जाते. देशातील सर्वाधिक श्रीमंत शहर असणाऱ्या मुंबईत अनेक प्रमुख संस्थांची मुख्य कार्यालये आहेत.
भारतातील एकूण अब्जाधीशंपैकी बहुतांशी अब्जाधीश तुम्हाला मुंबईतच दिसतील. अब्जाधीशांची संख्या मुंबईत फार अधिक आहे. याच मुळे मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात.
2) दिल्ली : मुंबईनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्ली चा नंबर लागतो. देशातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर येते आणि दिल्लीची जीडीपी 293.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
3) कोलकत्ता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता देशातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते. कोलकत्याची जीडीपी 150 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
4) बेंगळुरू : देशातील एक प्रमुख आयटी हब, आयटी कंपन्यांसाठी ओळखले जाणारे हे शहर देशातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर येते. या शहराची जीडीपी 110 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
5) चेन्नई : या यादीत चेन्नईचा पाचवा क्रमांक लागतो. भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत चेन्नई पाचव्या स्थानी येते आणि याची जीडीपी 78.6 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
6) हैदराबाद : भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत हैदराबाद शहराचा नंबर सहावा लागतो. या यादीत सहाव्या स्थानी असणाऱ्या या शहराची जीडीपी 75 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
7) पुणे : मुंबईनंतर महाराष्ट्रातील पुणे हे शहर देखील भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत येते. या यादीत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्याचा सातवा नंबर लागतो. पुण्याची जीडीपी 69 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
8) अहमदाबाद : गुजरात मधील महत्त्वाचे आर्थिक केंद्र अहमदाबाद या यादीत आठव्या क्रमांकावर येते. या शहराची जीडीपी 68 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
9) सुरत : देशातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत सुरत या शहराचाही नंबर लागतो. या यादीत हे शहर नवव्या स्थानी येते. या शहराचे जीडीपी 59.8 अब्ज डॉलर एवढी आहे.
10) विशाखापटनम : हे शहर या यादीत 10 व्या क्रमांकावर येते. देशातील टॉप 10 श्रीमंत शहरांच्या यादीत या शहराचा दहावा नंबर लागतो आणि याची जीडीपी 43.5 अब्ज डॉलर एवढी आहे.