India’s Richest State : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश आहे, देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे.
भारतात एकूण 36 राज्य आहेत यापैकी 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. दरम्यान आज आपण या 36 राज्यांपैकी सर्वाधिक श्रीमंत टॉप 9 राज्यांची माहिती पाहणार आहोत.

खरंतर सध्या केंद्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज पावसाळी अधिवेशनात सरकारकडून देशातील पर कॅपिटा इन्कमनुसार म्हणजे दरडोई उत्पन्नानुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्य कोणते याची माहिती देण्यात आली आहे.
खरं तर, भारतीयांच्या दरडोई उत्पन्नाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न एक लाख 14 हजार 710 इतके झाले आहे. सरकारकडून वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ही माहिती दिली आहे.
ही आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्य
आंध्र प्रदेश : या राज्याचा या यादीत नववा नंबर लागतो. या राज्याचे पर कॅपिटा इन्कम एक लाख 41 हजार 609 इतके आहे.
पुदुच्चेरी : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांच्या यादीत पुदुच्चेरी या राज्याचा आठवा नंबर लागतो. या राज्याचे दरडोई उत्पन्न एक लाख 55 हजार 533 रुपये इतके आहे.
उत्तराखंड : उत्तराखंड राज्याचे दरडोई उत्पन्न एक लाख 58 हजार 819 रुपये इतके आहे. यामुळे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत या राज्याचा सातवा नंबर लागतो.
हिमाचल प्रदेश : एक लाख 63 हजार 465 रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह हिमाचल प्रदेश या राज्याचा या यादीत सहावा नंबर लागतो.
महाराष्ट्र : एक लाख 76 हजार 678 रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह महाराष्ट्र राज्याचा या यादीत पाचवा नंबर लागतो.
तेलंगाना : एक लाख 87 हजार 912 रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह तेलंगणा राज्याचा या यादीत चौथा नंबर लागतो.
हरियाणा : एक लाख 94 हजार 285 रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह हरियाणा या राज्याचा या यादीत तिसरा नंबर लागतो.
तामिळनाडू : एक लाख 96 हजार 399 रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह तामिळनाडू राज्याचा या यादीत दुसरा नंबर लागतो.
कर्नाटक : दोन लाख चार हजार 605 रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह कर्नाटक राज्याचा या यादीत पहिला नंबर लागतो. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत कर्नाटक हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्य आहे.