India’s Top 9 Rich Farmer : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारताची अर्थव्यवस्था ही सध्या पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, तज्ज्ञांनी लवकरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार असे म्हटले आहे.
देशाची अर्थव्यवस्था अगदीच जलद गतीने वाढत आहे. भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे स्वप्न पाहत आहे. नक्कीच भारत आगामी काळात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता ठेवतो, अन भारतीय अर्थव्यवस्थेत तेव्हा देखील शेती क्षेत्राचे मोठे योगदान राहणार आहे.

शेती क्षेत्रावर भारताचे असणारे अवलंबित्व पाहता आपल्या देशाला कृषीप्रधान देशाचा दर्जा देण्यात आला आहे. पण आजही आपल्या देशात शेतकरी बांधव अडचणीत आहेत. विविध नैसर्गिक संकटांमुळे आणि शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जर शेतीमधून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन काढले तर बाजारपेठांमध्ये त्याला चांगला भाव मिळत नाही. अशा या दुहेरी संकटांमुळे शेतकरी राजा भरडला जातोय. पण अशी विपरीत परिस्थित असताना देखील भारतीय शेतकऱ्यांनी आपल्या नावाचा डंका संपूर्ण जगात गाजवला आहे.
अनेकजण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून करोडो रुपयांची कमाई मिळवत आहेत. दरम्यान आज आपण भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकऱ्यांची माहिती पाहणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे या यादीत जेवढे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी करोडपती आहेत. या यादीतील पहिल्या क्रमांकावर महिला शेतकऱ्याचे नाव आहे.
हे आहेत भारतातील 9 श्रीमंत शेतकरी
नितुबन पटेल : या महिला शेतकरी या यादीत पहिल्या क्रमांकावर येतात आणि त्यांची वार्षिक कमाई 100 कोटी रुपये इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे पटेल फक्त ऑरगॅनिक शेती करतात आणि यातूनच ते एवढी मोठी कमाई करत आहेत.
युवराज परिहार : युवराज हे यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतात आणि त्यांची वार्षिक कमाई 50 कोटी रुपये इतकी आहे. युवराज प्रामुख्याने बटाट्याची शेती करतात आणि यातूनच ते करोडो रुपयांची कमाई करत आहेत.
हरीश धनदेव : धनदेव या यादीतील तिसरे शेतकरी. हरीश धन देव शेतीमधून दरवर्षी अडीच कोटी रुपयांची कमाई काढत आहेत. हे प्रामुख्याने कोरफडीची लागवड करतात आणि त्यांना यातूनच करोडो रुपयांची कमाई होते. हरीश आधी इंजिनियर होते मात्र नंतर त्यांनी शेती सुरू केली आणि शेतीच आता त्यांचा मेन व्यवसाय बनलाय.
रमेश चौधरी : चौधरी हे दोन कोटी रुपयांच्या कमाई सह या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. ते वेगवेगळ्या पिकांची लागवड करून करोडो रुपये कमवत आहेत.
राम शरण वर्मा : दोन कोटी रुपयांच्या कमाई सह वर्मा या यादीत पाचव्या क्रमांकावर येतात. हे सुद्धा टोमॅटो बटाटा अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात.
सचिन काळे : दोन कोटी रुपयांच्या कमाई सह काळे या यादीतील सहावे शेतकरी आहेत.
गिना भाई पटेल : पटेल देखील वार्षिक दोन कोटी रुपयांची कमाई करतात अन आम्ही यांना या यादीत सातव्या स्थानी ठेवले आहे.
विश्वनाथ बोबोडे : पावणे दोन कोटी रुपयांच्या कमाई सह हे आठव्या स्थानावर येतात.
प्रमोद गौतम : प्रमोद गौतम हे या यादीत नवव्या क्रमांकावर येतात आणि हे या यादीतील शेवटचे शेतकरी आहेत. गौतम एक कोटी रुपयांच्या कमाई सह नवव्या क्रमांकावर येतात.