भारतातील टॉप 9 मेडिकल कॉलेजची यादी समोर ! यादीत महाराष्ट्रातील फक्त एका महाविद्यालयाचा समावेश

वैद्यकीय क्षेत्रात चांगले करिअर घडवायचे असेल तर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आज आपण देशातील टॉप 9 मेडिकल कॉलेज बाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

India’s Top Medical College : दहावी अन बारावीचे विद्यार्थी इंजीनियरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहतात. दरम्यान जर तुमचेही असेच स्वप्न असेल, तुम्हाला सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात करिअर बनवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 10 मेडिकल कॉलेजची माहिती पाहणार आहोत.

खरं तर भारतात शेकडो वैद्यकीय महाविद्यालय आहेत, यात लाखों विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण यातील सर्वाधिक प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालय कोणते? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. दरम्यान आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर घेऊन हजर झालो आहोत.

हे आहेत भारतातील टॉप 9 मेडिकल कॉलेज

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बीएचयु : बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे मेडिकल कॉलेज या यादीत नवव्या स्थानी आहे. या कॉलेजची वार्षिक फी पंधरा ते वीस हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे जर तुमचेही वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवायचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी या कॉलेजचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी लखनऊ : या यादीत किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटी लखनऊ या मेडिकल कॉलेजचा आठवा नंबर लागतो. मीडिया रिपोर्टनुसार या कॉलेजची वार्षिक फी 55 हजार रुपयांपासून ते 60 हजार रुपये इतकी आहे.

कस्तुरबा मेडिकल कॉलेज मनिपाल : मणिपाल येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेज सुद्धा या यादीत समाविष्ट आहे. या कॉलेजचा या यादीत सातवा नंबर लागतो. म्हणून जर तुम्हाला ही वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर तुमच्यासाठी कस्तुरबा मेडिकल कॉलेज बेस्ट पर्याय राहणार आहे. या कॉलेजची फी मात्र वर सांगितलेल्या दोन्ही कॉलेजेसपेक्षा अधिक आहे. या कॉलेजची फी ही 15 ते 18 लाख रुपये प्रतिवर्ष इतकी आहे.

JIPMER पुडुचेरी : पाँडिचेरी JIPMER हे मेडिकल कॉलेज या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या कॉलेजची वार्षिक फी ही जवळपास 35 ते 50 हजार रुपये इतकी आहे. जर तुम्हाला पॉंडिचेरी येथून मेडिकलचे शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी या कॉलेजचा पर्याय बेस्ट राहील.

मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली : अनेकजण राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून मेडिकलचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असतील. तुमचेही असेच स्वप्न असेल तर तुमच्यासाठी मौलाना आझाद मेडिकल कॉलेज म्हणजेच एमएएमसी दिल्लीचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. हे कॉलेज भारतातील टॉप 9 मेडिकल कॉलेजच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या कॉलेजची फी ही वार्षिक पंधरा हजार रुपये इतकी आहे.

आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे : Armed forces Medical College Pune हे महाराष्ट्रातील प्रमुख मेडिकल कॉलेज सुद्धा या यादीत समाविष्ट आहे. हे कॉलेज या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या कॉलेजची वार्षिक फी 30 ते 40 हजार रुपये इतकी आहे. जर तुम्हाला पुण्यातून वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी या महाविद्यालयाचा पर्याय नक्कीच बेस्ट ठरणार आहे.

ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर तामिळनाडू : तामिळनाडू मधील हे कॉलेज या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर तुम्हाला देशातील प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घ्यायचे असेल तर नक्कीच या कॉलेजचा तुम्ही विचार करू शकता. या कॉलेजची वार्षिक फी ही दीड ते दोन लाख रुपये इतकी आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदिगड : देशातीलच सर्वाधिक प्रतिष्ठित टॉप 9 मेडिकल कॉलेजमध्ये चंदीगड च्या या कॉलेजचा सुद्धा समावेश होतो. या यादीत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदिगड हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एम्स नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. हे देशातील नंबर एक मेडिकल कॉलेज आहे. अनेक विद्यार्थी येथून मेडिकलचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात. या कॉलेजची फी ही फक्त सहा ते सात हजार रुपये प्रतिवर्ष इतकी आहे. त्यामुळे जर तुमचे या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले तर खऱ्या अर्थाने तुमची लाइफ सेट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!