India’s Top Paid Actor : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचा विस्तार झपाट्याने झाला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत आता मोठ्या बजेटचे चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतील चित्रपट निर्माते अलीकडे चित्रपट बनवण्यासाठी 1000 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करू लागले आहेत.
यामुळे हॉलीवुड प्रमाणेच आता भारतीय चित्रपट सृष्टीतील चित्रपटांची देखील कमाई हजारो करोडोंच्या घरात पोहोचली आहे. यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांची प्रसिद्धी आणि कमाई सुद्धा वाढली आहे. चित्रपट हिट बनवण्यासाठी अभिनेते जी मेहनत घेतात त्यांचा त्यांना योग्य मोबदला सुद्धा मिळतो.

यामुळे अभिनय क्षेत्र हे अनेकांच्या आवडीचे आहे. अनेकांची चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. अनेकजण अभिनयात करिअर बनवण्याचा विचार करतात. ग्लॅमर्स लाईफ, प्रसिद्धी, पैसा, ऐशोआरामाचे आयुष्य या सर्व गोष्टीचे सर्वसामान्यांना अप्रूप वाटते.
पण, चित्रपट सृष्टीतील अभिनेते खरंच किती कमाई करतात, याची तुम्हाला माहिती आहे का? नाही ना मग आज आपण सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतातील टॉप 9 अभिनेत्यांची माहिती जाणून घेणार आहोत.
विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणारे अभिनेते हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नाहीत. या यादीतील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी जे अभिनेते आहेत ते साऊथचे आहेत म्हणजे टॉलीवूडमधील आहेत.
हे आहेत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 10 अभिनेते
अल्लू अर्जुन : भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता हा हिंदी चित्रपट सृष्टीतील असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण, अल्लू अर्जुन हा सध्याच्या घडीला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक महागडा अभिनेता आहे.
भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 10 अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुन पहिल्या स्थानी आहे. रिपोर्टवर जर विश्वास ठेवले तर पुष्पा दोन या अल्लू अर्जुन च्या सुपरहिट चित्रपटासाठी त्याने तब्बल 300 कोटी रुपये इतके मानधन घेतले होते. यावरून तो एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ थलापथी विजय : भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत थलापथी विजय यांचा दुसरा नंबर लागतो. ते एका चित्रपटासाठी 130 कोटी रुपयांपासून ते पावणेतीनशे कोटी रुपयांपर्यंतची फी घेतात.
शाहरुख खान : या यादीत किंग खान अर्थातच शाहरुख खानचा तिसरा नंबर लागतो. शाहरुख खान सुद्धा एका चित्रपटासाठी दीडशे ते अडीचशे कोटी रुपयांपर्यंतची फी घेत असतो.
रजनीकांत : या यादीत पॉलिटिशन आणि ऍक्टर रजनीकांत यांचा चौथा नंबर लागतो. ते एका चित्रपटासाठी 125 ते 270 कोटी रुपयांपर्यंतची फी घेतात.
आमिर खान : या यादीत आमिर खान यांचा पाचवा नंबर लागतो. एका चित्रपटासाठी 100 ते 275 कोटी रुपयांपर्यंतची फी घेतात.
प्रभास : या यादीत प्रभासचा सहावा नंबर लागतो आणि तो एका चित्रपटासाठी साधारणतः 100 ते 200 कोटी रुपयांपर्यंतची फी घेतो.
अजित कुमार : या यादीत अजित कुमारचा सातवा नंबर लागतो. अजित कुमार एका चित्रपटासाठी 105 ते 165 कोटी रुपयांपर्यंतची फी घेतो.
सलमान खान : या यादीत भाईजान चक्क आठव्या स्थानी आहे. सलमान खान एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपयांपर्यंतची फी घेतो.
कमल हासन : कमल हसन या यादीत नवव्या स्थानी येतो. कमल हसन एका चित्रपटासाठी शंभर ते दीडशे कोटी रुपयांपर्यंतची फी घेतो.
अक्षय कुमार : या यादीत अक्षय कुमारचा दावा नंबर लागतो. ते देखील एका चित्रपटासाठी 60 कोटीच्या पुढेच फी घेतात.