‘हे’ आहे भारतातील कमी खर्चात लग्नासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण, अवघ्या एका लाखात होणार शुभमंगल सावधान

Tejas B Shelar
Published:
India's Top Wedding Station

India’s Top Wedding Station : सध्या भारतात लग्नाचा सिझन सुरू आहे. ज्यांच्या लग्नगाठी जुळून आल्या आहेत ते सारे आता विवाह बंधनात अडकणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण भारतातील कमी खर्चात लग्नासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण अर्थातच वेडिंग डेस्टिनेशन कोणते आहेत हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरेतर, अनेकांच्या माध्यमातून या संदर्भात विचारणा केली जात होती. अशा परिस्थितीत, आज आपण भारतातील टॉप दोन वेडिंग डेस्टिनेशनची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

भारतातील लग्नासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण कोणते ?

मसूरी : उत्तराखंड हे पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. याच उत्तराखंडमध्ये अनेक वेडिंग डेस्टिनेशन तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये मसूरी हे देखील एक महत्त्वाचे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून अलीकडे नावारुपाला आले आहे.

प्रामुख्याने जेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच वेडिंग प्लॅन केला पाहिजे असे आवाहन केल्यानंतर भारतात वेडिंग डेस्टिनेशनचा शोध घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

दरम्यान, जर तुम्हीही भारतातच चांगल्या ठिकाणी आणि स्वस्तात लग्न करू इच्छित असाल तर मसूरी हे तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण ठरणार आहे.

येथे तुम्हाला अनेक स्वस्त वेडिंग डेस्टिनेशनसाठी रिसॉर्ट आणि हॉटेल्स उपलब्ध होणार आहेत. सुंदर पर्वत आणि शांत तथा रोमँटिक वातावरण या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि यामुळे तुमची वेडिंग निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.

यामुळे लग्न समारंभासाठी मसूरी हे भारतात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

नैनीताल : उत्तराखंड येथील आणखी एक प्रमुख वेडिंग डेस्टिनेशन म्हणून नैनीतालची ओळख आहे. जर तुम्हीही एखाद्या चांगल्या वेडिंग डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.

नवविवाहित जोडप्यांना लग्नाचा अविस्मरणीय आनंद देणारे हे ठिकाण निश्चितच लग्नासाठी उत्कृष्ट राहील यात शन्काच नाही. लग्न समारंभासाठी तुम्हाला येथे अनेक रीसॉर्ट, हॉटेल, गेस्ट हाऊस पाहायला मिळणार आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe