पोरांनो घरोघरी जाऊन कुल्फी विका पण ‘या’ भानगडीत मुळीच पडू नका, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची तुफान चर्चा

सध्या इंदुरीकर महाराजांचे हे विधान सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. महाराज आपल्या कीर्तनात सांगतात की, मी अनुभवावरून सांगतो तरुणांनो तुम्ही दंगलीच्या भानगडीत पडू नका. दंगलीत अडकला तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरीबांचीच मुले दंगलीत अडकली आहेत. श्रीमंत आणि राजकारण्यांचे कोणी यात अडकत नाही.

Published on -

Indurikar Maharaj Viral News : राष्ट्रीय कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. ते आपल्या कीर्तनातून गेल्या कित्येक वर्षांपासून समाजप्रबोधन करत आहेत. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना जगातील ज्या कोपऱ्यात मराठी भाषिक लोक आहेत त्या कोपऱ्यात ऐकले जाते, पाहिले जाते.

ते आपल्या कीर्तनात अगदीच विनोदाने लोकांची कान उघडणी करत असतात. तर काही वेळा ते आपल्या कीर्तनात असे काही वादग्रस्त मुद्दे मांडतात ज्यामुळे अनेकदा वाद तयार होतात.

दरम्यान इंदुरीकर महाराज यांनी तरुणांना एक मोठा अनमोल सल्ला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुका सुरू होण्याआधीच त्यांनी आपल्या कीर्तनातून तरुणांना सावध राहण्याचा अन काय करू नये याचा सल्ला दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आयोजित एका कीर्तनातून हभप इंदुरीकर महाराज यांनी तुम्ही गरीब राहा, वेळ पडली तर घरोघरी फिरून कुल्फी विका, आणखी काही व्यावसाय धंदा करा, पण दंगलींच्या भानगडीत पडू नका, असा सल्ल दिला आहे.

धर्माच्या नावाखाली गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, धर्मांचं भांडवल करु नका, असे सांगत त्यांनी राजकारण्यांचेही कान टोचले आहेत. यामुळे सध्या इंदुरीकर महाराजांचे हे विधान सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराज आपल्या कीर्तनात सांगतात की, मी अनुभवावरून सांगतो तरुणांनो तुम्ही दंगलीच्या भानगडीत पडू नका. दंगलीत अडकला तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरीबांचीच मुले दंगलीत अडकली आहेत. श्रीमंत आणि राजकारण्यांचे कोणी यात अडकत नाही.

जर कुणी तुम्हाला विचारले की तुम्हाला धर्माचा अभिमान नाही का ? तर त्याला बिनधास्त सांगायच की भावा तुमचा धर्म माईकवर आहे. पण, आमचा धर्म आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचे भांडवल करु नका.

धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका. दंगलीत अडकवून आमच्या पोरांचे करिअर उध्वस्त करू नका, असे राजकारण्यांना सांगितले पाहिजे, असेही यावेळी इंदुरीकर महाराज म्हणालेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News