इंडसइंड बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडणार का ? बँकेतील जमा रक्कम सुरक्षित आहे का ? RBI ने दिली मोठी माहिती

गेल्या काही दिवसांपासून इंडसइंड बँकेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. या बँकेच्या ठेवीदारांच्या माध्यमातून आमचे बँकेतील पैसे सुरक्षित आहेत की नाही अशी विचारणा केली जात आहे. खरे तर दहा मार्च 2025 रोजी इंडसइंड बँकेने एक्सचेंज फायलिंग मध्ये एक मोठी माहिती दिली. दरम्यान, या वृत्तानंतर बँकेचे शेअर्स कोसळले आहेत. इंडसइंड बँक आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसला आहे.

Published on -

IndusInd Bank News : गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील अनेक बँकांवर कठोर कारवाई केली आहे. आरबीआयने देशातील काही बँकांचे लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशातच, आरबीआयकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

या निवेदनात आरबीआयने इंडसइंड बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या काही दिवसांपासून इंडसइंड बँकेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. या बँकेच्या ठेवीदारांच्या माध्यमातून आमचे बँकेतील पैसे सुरक्षित आहेत की नाही अशी विचारणा केली जात आहे.

खरे तर दहा मार्च 2025 रोजी इंडसइंड बँकेने एक्सचेंज फायलिंग मध्ये एक मोठी माहिती दिली. बँकेच्या अंतर्गत पुनरावलोकनात असे आढळून आले की बँकेने पूर्वी परकीय चलन व्यवहारांशी संबंधित हेजिंग खर्च कमी केले होते.

या खुलाशानंतर, बँकेने कबूल केले की यामुळे त्यांची एकूण संपत्ती 1,600-2,000 कोटी (2.35%) कमी होऊ शकते. दरम्यान, या वृत्तानंतर बँकेचे शेअर्स कोसळले आहेत. इंडसइंड बँक आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसला आहे.

खरे तर गेल्या बारा महिन्यांच्या काळात बँकेचे शेअर 56 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र बँकेने या प्रकरणाचा आता तपास सुरू केला आहे. दुसरीकडे आता आरबीआय कडून याच बँकेबाबत मोठी माहिती देण्यात आली आहे. या बँकेत ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही? याबाबत आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

इंडसइंड बँकेत ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत का?

भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जाहीर केले आहे. यात इंडसइंड बँक लिमिटेडबाबतच्या अलीकडील अफवांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आरबीआयने सांगितले की, इंडसइंड बँक अजूनही आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे. आरबीआयच्या या निवेदनानंतर इंडसइंड बँक आणि तिच्या ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत, हे क्लिअर झाले आहे.

इंडसइंड बँकेच्या ग्राहक आणि ठेवीदारांच्या चिंता दूर करत, भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले आहे की इंडसइंड बँकेच्या ठेवीदारांनी घाबरण्याची गरज नाही. ग्राहकाने कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नये असे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले असून या बँकेवर आरबीआय लक्ष ठेवून असल्याचेही मध्यवर्ती बँकेकडून सांगितले गेले आहे.

या बँकेकडे अजूनही पुरेसे भांडवल आहे आणि बँकेची आर्थिक स्थिती ही समाधानकारक आहे. यामुळे या बँकेच्या ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काहीही एक कारण नसल्याचे जाणकार सांगत आहे.

दरम्यान आरबीआयने बँकेच्या स्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी आणि बँकेचे मूल्यांकन करण्यासाठी बाह्य लेखापरीक्षण टीम सुद्धा नियुक्त केलेली आहे. एकंदरीत आरबीआयच्या या निवेदनानंतर सदर बँकेच्या ग्राहकांनी अखेरकार सुटकेचा निश्वास घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe