गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर ते अनेक आहेत. परंतु गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून बघितले तर बँकांच्या विविध मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनांना प्राधान्य दिले जाते. त्या खालोखाल भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एलआयसीच्या योजना देखील गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध आहे.
एलआयसीच्या अनेक योजनांच्या माध्यमातून तुम्हाला परतावा तर मिळतोच परंतु या माध्यमातून तुम्हाला विमा कव्हर देखील मिळत असते. एलआयसीच्या अनेक योजना आहेत व त्यापैकी जर आपण एलआयसीची न्यू जीवन शांती प्लान या योजनेबद्दल बघितले तर ही योजना गुंतवणुकीसाठी खूप फायद्याची आहे. या प्लानमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही एक लाख रुपये पेन्शन मिळवू शकतात.

एलआयसीची न्यू जीवन शांती प्लान योजना आहे फायद्याची
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या माध्यमातून अनेक योजना असून सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक आकर्षक योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येतात. एलआयसीच्या माध्यमातून व्यक्तीच्या निवृत्तीच्या नंतरच्या काळातील आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून देखील अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत.
यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे न्यू जीवन शांती प्लान योजना होय. ज्या गुंतवणूकदाराला वर्षाकाठी एक लाख रुपये इतकी पेन्शन मिळवायची असेल त्यांच्यासाठी न्यू जीवन शांती प्लॅन ही योजना फायद्याची आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वर्षासाठी एक लाख रुपयांचे पेन्शन मिळते.
या योजनेत गुंतवणुकीसाठी काय लागते वयोमर्यादा ?
एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेकरिता गुंतवणूकदारांसाठी वयोमर्यादा ही 30 ते 79 वर्ष इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदे देखील मिळतात. या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही इच्छा असेल तर एकाच योजनेत गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही एकत्र गुंतवणुकीचा पर्याय देखील निवडू शकता.
एक लाखाच्या पेन्शनचा फायदा कसा मिळेल ?
समजा एखाद्या 55 वर्षाच्या व्यक्तीने जर या न्यू जीवन शांती प्लानमध्ये अकरा लाख रुपये जर गुंतवले व ते पाच वर्षांकरिता गुंतवले असतील तर वयाचे साठ वर्षे झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षी एक लाख 2 हजार 850 रुपये पेन्शन मिळते. हे पेन्शन गुंतवणूकदारांना दर सहा महिन्यांनी किंवा दर महिन्याला देखील मिळू शकते. म्हणजेच प्रत्येक महिन्याला जर तुम्हाला पेन्शन घ्यायचे असेल तर ती 8,217 रुपये मिळेल आणि सहा महिन्यांनी घ्यायचे असेल तर 50 हजार 365 रुपये मिळेल.
या योजनेद्वारे हे फायदे देखील मिळतात
याशिवाय या योजनेमध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर अशा गुंतवणूकदाराला त्याच्या खात्यामध्ये जमा झालेली संपूर्ण रक्कम संबंधित पॉलिसीधारकाच्या वर्षाला दिली जाते. म्हणजेच एलआयसीच्या या योजनेमध्ये 11 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला बारा लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम मिळते.