10 हजार रुपयांची महिन्याला गुंतवणूक बनवेल तुम्हाला करोडपती! 10-15-18 चा फॉर्मुला करेल तुम्हाला मदत

गुंतवणूक सुरू केली तर त्यामध्ये सातत्य ठेवणे खूपच गरजेचे आहे व उच्च परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक करणे हा देखील एक महत्त्वाचा नियम असतो. तिसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गुंतवणूक करताना योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड सगळ्यात महत्त्वाची असते.

Ajay Patil
Published:
investment

Investment Formula:- तुम्ही जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर काही दिवसांनी ही गुंतवणूक तुम्हाला लखपती ते करोडपती बनवते हे आपल्याला माहिती आहे. परंतु गुंतवणूक करताना देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर त्यामध्ये सातत्य ठेवणे खूपच गरजेचे आहे व उच्च परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक करणे हा देखील एक महत्त्वाचा नियम असतो. तिसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गुंतवणूक करताना योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड सगळ्यात महत्त्वाची असते.

जेव्हा या महत्त्वाच्या गोष्टींची सांगड गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून घातली जाते तेव्हा आपल्याला उच्च असा परतावा गुंतवणुकीतून मिळत असतो.अगदी याच पद्धतीने जर आपण सध्याचा गुंतवणुकीतील ट्रेंड बघितला तर तो प्रामुख्याने एसआयपीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान हा गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय असून गेल्या काही वर्षापासून बरेच गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून विविध म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असताना दिसून येत आहेत. परंतु म्युच्युअल फंड एसआयपी मधून जर तुम्हाला चांगला परतावा मिळवायचा असेल तर काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे व त्या नियमांना धरूनच गुंतवणुकीचे सूत्र ठरवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.

त्यामुळे अशा सूत्रानुसार गुंतवणूक जर करत गेलात तर काही वर्षांनी करोडो रुपये तुम्ही जमा करू शकतात. याच मुद्द्याला धरून या लेखामध्ये आपण असा एक फार्मूला बघणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही दहा हजारांची एसआयपी महिन्याला केली तरी देखील काही वर्षांनी करोडपती होऊ शकतात.

कारण एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा फायदा असा होतो की यामध्ये म्हटले जाते की तुम्ही जी गुंतवणूक करतात त्यावर तुम्हाला वार्षिक 12 ते 15 टक्क्यांपर्यंत व्याजदर उपलब्ध होतो व तसा परतावा मिळतो. तसेच एसआयपीच्या माध्यमातून चक्रवाढ म्हणजेच कंपाउंडिंग मुळे देखील पैसा जास्त प्रमाणात जमा होऊन पटकन श्रीमंतीच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.

10-15-18 चा फॉर्मुला करेल तुम्हाला गुंतवणुकीत मदत
एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना जर तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर नक्कीच तुम्हाला चांगली मदत होऊ शकते. हा फार्मूला जर समजून घेतला तर यातील दहा या अंकाचा जर अर्थ पकडला तर गुंतवणुकीसाठी दहा हजाराची रक्कम निवडणे म्हणजे दहा हजार रुपयांची गुंतवणूक करणे.यातील पंधरा या अंकाचा अर्थ म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला जर 15 टक्क्यांचा परतावा आणि 18 म्हणजे 18 वर्षे सातत्याने गुंतवणूक करणे असा होतो.

समजा तुम्ही जर दहा हजार रुपयांची प्रत्येक महिन्याला एसआयपी सुरू केली व ती अठरा वर्षापर्यंत करत राहिला तर तुमच्या 18 वर्षात एकूण गुंतवणूक 21 लाख 60 हजार रुपये इतके होते व या एकूण गुंतवणुकीवर व्याज आणि कंपाउंडिंग मिळून तुमची मुद्दल सोडून 88 लाख 82 हजार 553 रुपये तुम्हाला मिळतात.

अशाप्रकारे तुम्ही व्याज आणि तुमची जमा झालेली मुद्दल मिळवून तुम्हाला एक कोटी दहा लाख 42 हजार 553 रुपये मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला वापरून गुंतवणुकीत सातत्य ठेवून जर गुंतवणूक करत राहिला तर 18 वर्षात तुम्ही एक कोटीपेक्षा जास्त पैसे जमा करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe