गुंतवणूकदार होणार मालामाल ! 3 दिवसात 27% रिटर्न, स्टॉक स्प्लिटची मोठी घोषणा

Published on -

Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी सिक्को इंडस्ट्रीज लिमिटेडची शेअर्स गेल्या काही दिवसापासून बाजारात वेगाने वाढत आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर दहा टक्के अपर सर्किटसह 124.20 पर्यंत पोहोचला आहे आणि त्यानंतर सलग या स्टॉकमध्ये तेजी दिसून आलीये. फक्त तीन दिवसात शेअर मध्ये 27 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ अलीकडेच कंपनीकडून करण्यात आलेल्या बोनस शेअर्स आणि शेअर्स विभाजनाच्या घोषणेमुळे झाली आहे. कंपनीच्या बोर्डाने 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतलाय.

या दोन महत्त्वाचे निर्णयांना मंजुरी मिळाल्याने गुंतवणूक दारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिको इंडस्ट्रीजच्या बोर्डनुसार कंपनी १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स शेअर होल्डर्सला जारी करणार आहे. म्हणजेच प्रत्येक एक शेअरवर गुंतवणूकदारांना एक बोनस शेअर मिळणार आहे. याशिवाय, कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक्स स्प्लिट जाहीर केला आहे. म्हणजेच प्रत्येक 10 रुपये फेस व्हॅल्यूचा शेअर आता 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या दहा शेअर्समध्ये विभागला जाणार आहे.

गेल्या एका महिन्यात सिको इंडस्ट्रीजचा शेअर 82% पेक्षा अधिक वाढला आहे 23 सप्टेंबर 2025 रोजी हा शेअर 67.77 वर होता तर 23 ऑक्टोबर पर्यंत तो 124.20 पर्यंत पोहोचला.

चार वर्षात 350% रिटर्न

गेल्या चार वर्षात कंपनीच्या शेअर्सने तब्बल 358 टक्के वाढ दाखवली आहे. यातून गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा झालाय. आता बाजार विश्लेषकांनी याबाबत मोठं भाकीत सांगितलंय. बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट यामुळे कंपनीच्या शेअरचा टर्न ओव्हर वाढण्याची शक्यता आहे तसेच कंपनीच्या वाढत्या नफ्यामुळे आणि मजबूत फंडामेंटल मुळे सिक्को इंडस्ट्रीजवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. कंपनीने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट साठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. पण पुढील काही दिवसात या संदर्भात कंपनी अधिक माहिती देणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe