IPO GMP : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत तसेच काही कंपन्या बोनस शेअर्स आणि डिव्हीडंट देण्याची घोषणा सुद्धा करत आहेत यामुळे सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात हालचाली दिसत आहेत.
तिमाही निकाल, बोनस शेअर आणि डिव्हिडंट मुळे अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या फोकस मध्ये आहेत. अशातच आता शेअर बाजारातून एक मोठे अपडेट समोर आले आहे ते म्हणजे एका ब्रँडेड वस्तू विकणाऱ्या कंपनीचा आयपीओ आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

अॅपल आणि नथिंग सारख्या अनुभवी ब्रँडसह भागीदारी झालेल्या एचपी टेलिकॉमचा आयपीओ आज 20 फेब्रुवारी रोजी उघडला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या आयपीओ बाबत सर्व प्रकारची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या तारखेपर्यंत गुंतवणूक करता येणार
एचपी टेलिकॉम चा आयपीओ आज पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून यामध्ये गुंतवणूकदारांना 24 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करता येईल, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एचपी टेलिकॉम कंपनीच्या या 34.23 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये केवळ नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच या अंतर्गत जारी करण्यात आलेले शेअर्सचे लिस्टिंग एनएसई एसएमईवर होणार आहे. आता आपण या आयपीओ चे प्राईस बँड जाणून घेऊयात.
HP Telecom India IPO प्राईस बँड
HP Telecom India IPO मध्ये प्रति शेअर किंमत 108 रुपये ठेवण्यात आली आहे अन लाॅट आकार 1,200 शेअर्सचा आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना किमान 1200 शेअर्स अर्थातच एक लाख 29 हजार 600 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
आयपीओ अंतर्गत शेअर्सचे वाटप 25 फेब्रुवारी रोजी अंतिम केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे अन त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी एनएसई एसएमईवर याची लिस्टिंग होणार आहे.
खरेतर एचपी टेलिकॉम इंडिया कंपनीच्या या आयपीओमध्ये 31,69,200 नवीन शेअर्स जारी केले जातील. दरम्यान कंपनी या शेअर्सद्वारे गोळा केलेल्या पैशाचा वापर कार्यरत भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी आणि कॉर्पोरेटच्या सामान्य उद्देशासाठी करणार आहे.