पैसा तयार असू द्या ! येत्या आठवड्यात ‘या’ 3 कंपन्यांचे आयपीओ खुले होणार

शेअर बाजारात नवीन गुंतवणुकीची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा मोठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. पुढचा आठवडा अशा गुंतवणूकदारांसाठी फारच रोमांचक राहणार आहे. कारण पुढील आठवड्यात 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान एकूण 3 IPO गुंतवणूकदारांसाठी उघडले जाणार आहेत.

Tejas B Shelar
Published:

IPO GMP : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक अगदीच आनंदाची आणि अतिशय महत्त्वाचे बातमी समोर येत आहे. जर तुम्ही शेअर बाजारात नवीन गुंतवणूकीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे.

खरे तर शेअर बाजारात नवीन गुंतवणुकीची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा मोठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. पुढचा आठवडा अशा गुंतवणूकदारांसाठी फारच रोमांचक राहणार आहे. कारण पुढील आठवड्यात 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान एकूण 3 IPO गुंतवणूकदारांसाठी उघडले जाणार आहेत.

यामुळे जर तुम्हाला पुढील आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधीच ठरणार आहे पण यासाठी तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करून ठेवावी लागणार आहे. दरम्यान आता आपण पुढील आठवड्यात जे तीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उघडले जाणार आहेत त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Hexaware Technologies IPO : Hexaware Technologies चा IPO पुढील आठवड्यात खुला होणार आहे. याचा IPO शेअर बाजारात पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. हा IPO पुढील आठवड्यात १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान उघडणार असल्याची माहिती कंपनीकडून हाती आली आहे.

या आयपीओचा आकार सुमारे 8700 कोटी रुपये आहे, परंतु तो संपूर्ण विक्रीसाठी ऑफर (OFS) आहे. म्हणजेच या IPO मधून कंपनीला कोणतीही रक्कम मिळणार नाही. त्याची किंमत 674 ते 708 रुपये निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये किमान 14,868 रुपये गुंतवावे लागतील. त्याची यादी 19 फेब्रुवारीला होऊ शकते.

चंदन हेल्थकेअर IPO : हा SME IPO पुढील आठवड्यात उघडणार आहे. चंदन हेल्थकेअर लिमिटेड हा IPO 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान उघडेल, अशी माहिती समोर आली आहे. त्याची इश्यू साइज 107.36 कोटी रुपये आहे. प्राईस बँड 151 ते 159 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.

त्याची लॉट साइज 800 शेअर्स आहे. म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांना यात किमान 1,27,200 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे आहे. त्याची सूची 17 फेब्रुवारी रोजी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर येऊ शकते असा एक अंदाज समोर येत आहे.

Ajax Engineering Limited : पुढील आठवड्यात Ajax Engineering Limited चा IPO खुला होणार आहे. हा IPO 10 फेब्रुवारीला उघडेल आणि 12 फेब्रुवारीपर्यंत यात बोली लावता येईल. त्याच्या इश्यूचा आकार सुमारे 1,269.35 कोटी रुपये इतका आहे.

हा IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) आहे. याचा अर्थ कंपनी या IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी करत नाही, उलट विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे सुमारे 2 कोटी शेअर्स विकत आहेत. म्हणजे कंपनीला IPO मधून कोणतीही रक्कम मिळणार नाही.

या IPO ची किंमत 599 रुपये ते 629 रुपये निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी त्याची लॉट साइज 23 शेअर्स आहे आणि त्यांना किमान 14,467 रुपये गुंतवावे लागतील. वाटप 13 फेब्रुवारीला होणे अपेक्षित आहे आणि यादी 17 फेब्रुवारीला येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe