IPO GMP : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेश मधील रतलाम येथे स्थित असणाऱ्या एलके मेहता पॉलिमर्स लिमिटेड या कंपनीचा स्वस्त आयपीओ लवकरच खुला होणार आहे. हा आयपीओ 7.38 कोटी रुपयांचा फिक्स प्राइस इश्यू आहे.
हा नवा इश्यू 10.40 लाख शेअर्सचा आहे. हा आयपीओ शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी राहणार आहे. म्हणूनच आज आपण या ipo ची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
![IPO GMP](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/IPO-GMP.jpeg)
कसा राहणार एलके मेहता पॉलिमर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ
मिळालेल्या माहितीनुसार, हा एसएमई आयपीओ 13 फेब्रुवारी 2025 रोजी खुला होणार आहे तसेच 17 फेब्रुवारी 2025 रोजी क्लोज केला जाईल.
तसेच 18 फेब्रुवारी रोजी याचे शेअर्स वाटप अंतिम केले जाणार आहे आणि 20 फेब्रुवारीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एस एम ई वर शेअरची लिस्टिंग होईल अशी शक्यता आहे. या ipo च्या किमती बाबत बोलायचं झालं तर आयपीओ ची किंमत 71 रुपये प्रति शेअर एवढी आहे.
या आयपीओ चा एका एप्लीकेशन सह किमान लॉट साईझ हा 1600 शेअर्स इतका आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान एक लाख 13 हजार 600 रुपये एवढी गुंतवणूक या ठिकाणी करायची आहे.
कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी आहे?
या कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झालं तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा महसूल 18.87 कोटी रुपये आणि करोत्तर नफा हा 86 लाख रुपये इतका राहिला होता.
आता चालू आर्थिक वर्षात 30 जून 2024 रोजी संपलेल्या कालावधीपर्यंत कंपनीचे उत्पन्न 4.01 कोटी रुपये आणि करोत्तर नफा 21 लाख रुपये इतका आहे.
दरम्यान कंपनी या आयपीओच्या माध्यमातून म्हणजेच या इश्यूमधून जमा होणारा निधी वर्किंग कॅपिटल साठी वापरणार आहे. कंपनी वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी हा पैसा वापरेल अशी माहिती समोर आली आहे.