IRB Infra Share Price : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली होती आणि आता RBI चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सुद्धा सर्वसामान्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. खरेतर, आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची बैठक संपली.
या बैठकीत तब्बल 5 वर्षांनंतर RBI ने महत्त्वाचा निर्णय घेतला. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. 5 वर्षांनंतर RBI कडून रेपो रेट कमी करण्यात आला आहे.
![IRB Infra Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/IRB-Infra-Share-Price-1.jpeg)
नवीन आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील मॉनेटरी पॉलिसी समितीच्या (MPC) बैठकीत हा व्याजदर कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आरबीआयच्या या घोषणेचा शेअर बाजारावर सुद्धा परिणाम होतोय.
आज शेअर बाजारात थोडीशी उलथापालथ पाहायला मिळाली. आज बीएससी सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण दिसली. आज बीएसई सेन्सेक्स -46.15 अंकांनी घसरून 78012.01 वर अन NSE निफ्टी -13.20 अंकांनी घसरून 23590.15 वर पोहोचला आहे.
आय आर बी इन्फ्रा शेअर मध्ये देखील आज मोठी घसरण दिसली. मात्र स्टॉक मध्ये घसरण होत असली तरी देखील स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून हा स्टॉक आगामी काळात चांगली कामगिरी करताना दिसेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
IRB Infra ची शेअर बाजारातील सध्याची स्थिती
या स्टॉक मध्ये आज 1.60 टक्क्यांची घसरण झाली आणि सध्या हा स्टॉक 53.12 वर ट्रेड करतोय. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 78.15 रुपये अन 52 आठवड्याचा नीचांक 45.06 रुपये आहे. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 32,158 Cr. रुपये आहे, अन कंपनीवर 18,838 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.
IRB Infra साठीची नवीन टार्गेट प्राईस काय?
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक आगामी काळात चांगली कामगिरी करताना दिसेल असे संकेत दिले आहेत. तसेच या ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आला आहे.
ब्रोकरेजनुसार आयआरबी इन्फ्रा लिमिटेडचा शेअर ६५ रुपये ते ६७ रुपयांपर्यंत वाढू शकतो. एवढेच नाही तर स्टॉक मार्केट मधील काही अन्य विश्लेषकांनी या स्टॉकच्या किमती 81 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज दिला आहे म्हणजेच यासाठी 81 रुपयांचे नवे टारगेट प्राईज सेट करण्यात आले आहे.
IRB इन्फ्राने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला?
गेल्या 5 दिवसात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक -1.15 टक्क्यांनी, मागील 1 महिन्यात -8.99 टक्क्यांनी, मागील 6 महिन्यात -15.39 टक्क्यांनी, मागील 1 वर्षात -22.90 टक्क्यांनी अन YTD आधारावर हा शेअर -10.78 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मागील 5 वर्षात हा शेअर 389.13 टक्क्यांनी अन लॉन्ग टर्ममध्ये हा स्टॉक 174.38 टक्क्यांनी वाढला आहे.