IRB Infra Share Price : भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे या घसरणीच्या काळातही शेअर बाजारात असे काही स्टॉक आहे जे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसत आहेत. दरम्यान, या घसरणीच्या काळातच आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

खरे तर आज या कंपनीचे स्टॉक घसरले आहेत मात्र आगामी काळात या कंपनीचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त होतोय. यामुळे ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी होल्ड रेटिंग देण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि आगामी काळात या कंपनीचे स्टॉक किती पर्यंत जाणार ? याबाबत ब्रोकरेजकडून काय अंदाज वर्तवण्यात आला आहे याचीच सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आयआरबी इन्फ्राची सध्याची स्थिती कशी आहे?
आज या कंपनीचे स्टॉक त्याच्या प्रिव्हियस क्लोजिंग प्राईसपेक्षा 3.67% नी घसरलेत. या कंपनीची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 47.70 इतकी होती मात्र आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक 3.67% नी घसरलेत आणि 46.01 रुपयांपर्यंत खाली आलेत. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 78.15 इतका आणि निचांक 45.06 इतका आहे.
या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 27 हजार 755 कोटी इतके असून सध्या या कंपनीवर 18,838 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. आता आपण या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात किती परतावा दिला आहे याबाबत माहिती पाहूयात.
गेल्या पाच वर्षात किती परतावा मिळाला
या कंपनीचे स्टॉक गेल्या एका वर्षात 31.20 टक्क्यांनी घसरले तर मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये या कंपनीचे स्टॉक 82.41 टक्क्यांनी आणि पाच वर्षांमध्ये याचे स्टॉक 388.21 टक्क्यांनी वधारले आहेत. YTD आधारावर बोलायचं झालं तर या कंपनीचे स्टॉक 19.75 टक्क्यांनी घसरले आहेत.
ब्रोकरेज काय म्हणतात
Yahoo Finance Analyst ने या स्टॉक साठी होल्ड रेटिंग दिली आहे. सध्या हा स्टॉक 46.01 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र भविष्यात या स्टॉकच्या किमती 81 रुपयांना स्पर्श करू शकतात. या स्टॉक साठी 81 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे.