IRB Infra शेअर 75 रुपयांवर जाणार! शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत

IRB Infra Share Price : आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये तेजी पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. आज 28 जानेवारीला शेअर बाजार खुला झाला

अन बीएसई सेन्सेक्स 292 अंकांनी वधारून 75659 वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी 131 अंकांनी वधारून 22960 वर पोहचला. शेअर बाजारातील ही तेजी गुंतवणूकदारांसाठी उत्साहवर्धक ठरली आणि या तेजीच्या काळातच इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधील एक महत्त्वाचा स्टॉक तेजीत येणार असे संकेत मिळू लागलेत.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक आगामी काळात तेजीत येऊ शकतो असे संकेत मिळू लागले आहेत. सध्या हा शेअर 49.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. खरे तर आज या स्टॉक मध्ये 0.51 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

आज हा स्टॉक 50.50 रुपयांवर ओपन झाला. सकाळी 10.03 वाजता आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा शेअर दिवसभरातील उच्चांक 50.73 रुपये होता, मात्र यात नंतर घसरण पाहायला मिळाली.

आज या स्टॉकचा निच्चांकी स्तर 49.18 रुपये इतका नमूद करण्यात आला. दरम्यान या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 78.15 रुपये अन 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 45.06 रुपये इतका राहिला. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 29,796 कोटी रुपये इतके आहे.

तसेच कंपनीचा P/E रेशो -7.69 इतका राहिला अन या कंपनीवर सध्या 18,838 रुपये इतकं कर्ज आहे. या शेअरची प्रेविअस क्लोजिंग 49.55 इतकी नमूद करण्यात आली होती. आज दिवसभर हा शेअर 49.10 ते 50.73 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

गेल्या एका वर्षाचा विचार केला असता हा स्टॉक 45.06 ते 78.15 यादरम्यान ट्रेड करत होता. गेल्या पाच वर्षात हा स्टॉक 402 टक्क्याहुन अधिक वाढला आहे. तसेच लॉन्ग टर्म मध्ये यात 154.65% इतकी वाढ झाली आहे.

हा शेअर नीचांकी पातळीवर असला तरी देखील यामध्ये तेजीचे संकेत मिळत असल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे. स्टॉक मार्केट विश्लेषक ध्वनी शाह पटेल यांनी या स्टॉकबाबत सकारात्मक संकेत दिले असून हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिलाय.

या स्टॉक साठी त्यांनी 75 रुपयांचे टार्गेट प्राईस आणि 48 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिलाय. हा स्टॉक 48 रुपयांच्या खाली गेल्यास यामध्ये स्ट्रक्चरल रिव्हर्सल सुद्धा दिसू शकते असेही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe