Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
ITC Hotel Share Price

हॉटेल इंडस्ट्रिजचा ‘हा’ शेअर 280 रुपयांवर जाणार ! शेअर्स 63% पर्यंत वाढणार

Thursday, February 13, 2025, 11:03 AM by Tejas B Shelar

ITC Hotel Share Price : सध्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपली तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर आणि डिव्हीडंट देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात सूचीबद्ध असणारा एक हॉटेल इंडस्ट्रिजचा स्टॉक लवकरच तेजीत येणार आहे. आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स आज पुन्हा फोकसमध्ये आले आहेत.

आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारी बीएसईवर हा स्टॉक 172 वर व्यवहार करत आहे. दरम्यान आता कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने ITC हॉटेल्सचे कव्हरेज सुरू केले आहे.

ITC Hotel Share Price
ITC Hotel Share Price

या ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की, बुल केसमध्ये कंपनीचे शेअर्स 63 टक्क्यांनी वाढू शकतात. ITC हॉटेल्सचे शेअर्स 29 जानेवारी 2025 रोजी 188 रुपयांवर BSE वर 31 टक्के सूट देऊन सूचीबद्ध झाले. कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्च पातळी 189 रुपये इतकी आहे.

ब्रोकरेजचा सल्ला काय?

ब्रोकरेज हाऊस जेफरीजने ITC हॉटेल्सच्या स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे, म्हणजे हा स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीजने कंपनीच्या शेअर्ससाठी 240 रुपयांचे टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे ITC शेअर्स त्याच्या बेस केसमध्ये 40 टक्क्यांनी वाढू शकतात असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.

ब्रोकरेजने त्यांच्या बुल केस परिस्थितीत, ITC हॉटेल्सचे शेअर्स 280 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असे सांगितले आहे. म्हणजेच, सध्याच्या पातळीपासून हॉटेल कंपनीच्या शेअर्समध्ये 63 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ITC हॉटेल्सच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 160.55 रुपये इतकी आहे.

कंपनीचा रिवेन्यू वाढणार

ब्रोकरेज हाऊस जेफरीजने 2024-27 या आर्थिक वर्षात ITC हॉटेल्सचा महसूल 15 टक्के CAGR ने वाढू शकतो असा अंदाज यावेळी वर्तवला आहे. सध्या, ITC हॉटेल्सच्या पोर्टफोलिओमध्ये 25 मालकीची हॉटेल्स आहेत, ज्यात 15 ITC ब्रँड हॉटेल्स, 9 वेलकम हॉटेल्स आणि 1 फॉर्च्यून हॉटेलचा समावेश आहे.

ITC हॉटेल्सचे मालमत्ता मिश्रण संतुलित आहे. ITC हॉटेल्सचे मार्केट कॅप सध्या 35,700 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. कंपनीमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी 39.88 टक्के आहे. त्याच वेळी, सार्वजनिक भागीदारी 60.12 टक्के आहे.

Categories स्पेशल Tags ITC Hotel Share Price
Multibagger Stock : शेअर म्हणावं का की कुबेरांचा खजिना ? १ लाखांचे झाले २ कोटी ! कोण आहे हा छुपा रुस्तम शेअर ?
सोन्याच्या किंमती पुन्हा बदलल्या ! आज, 13 फेब्रुवारी 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा नवीन रेट पहा, महाराष्ट्रातील सोन्याच्या किमती कशा आहेत?
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress