JEE, NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च महाराष्ट्र राज्य सरकार उचलणार ! कोणाला मिळणार लाभ? नवा प्रस्ताव समोर

JEE, NEET Exam : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरेल. खरे तर विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी अहोरात्र काबाडकष्ट करतात. बोर्ड एक्झाम मध्ये चांगले गुण मिळवतात. कित्येक विद्यार्थी बोर्डात प्रथम येतात. 95-96 टक्के मिळवतात.

मात्र यातील अनेक विद्यार्थी फक्त घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने इंजीनियरिंग आणि मेडिकल फील्ड ला जात नाहीत. अशा होतकरू विद्यार्थ्यांना JEE, NEET परीक्षेची तयारी करायची असते मात्र पैशाअभावी त्यांना अशा परीक्षांची तयारी करता येत नाही, योग्य ती कोचिंग घेता येत नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे.

दरम्यान आता अशाच विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. अशा गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांचा JEE, NEET परीक्षेचा खर्च आता राज्य शासन स्वतः उचलणार आहे. यासाठी दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे.

दहावीनंतर विज्ञान शाखेला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्वतंत्र परीक्षा राहणार आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार मेरीट प्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांचा खर्च हा शासनाकडून उचलला जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील 50 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा दोन वर्षांचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने त्या संदर्भात माहिती दिली आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने JEE आणि NEET परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर-50’ ही नवी योजना प्रस्तावित केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे याबाबतचा प्रस्ताव सरकारला सुद्धा पाठवण्यात आला आहे. दरम्यान राज्य शासनाने सुपर- 50 चा प्रस्ताव मान्य केला की मगच गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू होणारा हा अभिनव उपक्रम सुरू होणार आहे.

पण या प्रस्तावित योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सुद्धा दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक राहणार आहे. अर्थातच ही योजना गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार आहे. तसेचं या परीक्षेची प्रश्नपत्रिका शासनाकडूनच तयार करून दिली जाणार आहे.

या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून 50 विद्यार्थी निवडले जाणार आहेत. मग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार जेईई किंवा नीट अथवा काहींना दोन्ही परीक्षेच्या (जेईई व नीट) प्रशिक्षणाची संधी दिली जाणार अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर आली आहे.

या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नामांकित कोचिंग क्लास तथा प्रशिक्षण संस्थांमधून ‘जेईई’ व ‘नीट’ची तयारी करून घेतली जाणार आहे आणि याचा खर्च शासन स्वतः उचलणार आहे.

यावर्षी अकरावी सायन्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. म्हणजे ज्या वर्षी दहावीचे 50 आणि 11 वी उत्तीर्ण 50 असे एकूण 100 विद्यार्थी शासनाकडून जेईई आणि नीट साठी तयार केले जाणार आहेत.

माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे संचालक महेश पालकर यांनी यासाठी दहावी उत्तीर्ण होणारे आणि विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आणि यामध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील 50 विद्यार्थ्यांना पुढील 2 वर्ष Jee आणि Neet ची फ्री कोचिंग मिळणार आहे. कोचिंग चा खर्च सरकार उचलणार आहे.