Jio Coin Price : सध्या भारतात जिओ कॉइन ची चर्चा आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या रिलायन्स जिओने सादर केलेले हे जिओ कॉइन सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून आज आपण याच जिओ कॉइन च्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
या जिओ कॉइनची संभाव्य किंमत अन याचा वापर कुठे कुठे होणार? याची तपशीलवार माहिती आज आपण घेणार आहोत. सोबतच जिओ कॉइन क्रिप्टोकरन्सी आहे का? याबाबत तज्ञ काय सांगतात याविषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, रिलायन्स जिओने आपल्या डिजिटल सेवांमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत जिओ क्वाईन नावाचे नवे डिजिटल टोकन सादर केले आहे. पण हे टोकन क्रिप्टो करन्सी नाहीये.
सध्या Jio Coin क्रिप्टोकरन्सी नसून, ते डिजिटल रिवॉर्ड टोकन किंवा लॉयल्टी पॉइंट्स स्वरूपात वापरले जाणार आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांना त्यांच्या सेवांचा अधिक लाभ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
क्रिप्टो करेंसी नाही मग काय आहे जिओ क्वाईन?
जिओ क्वाईन हे पॉलीगॉन ब्लॉकचेनवर तयार करण्यात आले असून, हे टोकन जिओच्या विविध अॅप्स आणि सेवांमध्ये वापरता येणार आहे. ग्राहकांना जिओच्या अॅप्सवर खरेदी किंवा सेवांचा वापर केल्यावर जिओ क्वाईन मिळणार आहे.
जिओ क्वाईनची संभाव्य किंमत किती?
अद्याप रिलायन्स जिओने अधिकृतपणे किंमत जाहीर केलेली नसली, तरी काही तज्ज्ञांच्या मते एका जिओ क्वाईनची किंमत अंदाजे 0.50 डॉलर (सुमारे 43.30 रुपये) असू शकते.
कुठे आणि कसा वापरता येईल जिओ क्वाईन?
जिओच्या अॅप्स आणि सेवांमध्ये जसे की JioCinema, JioMart, JioSaavn, JioCloud यामध्ये जिओ क्वाईनचा वापर करता येईल. जिओ अॅप्सवर खरेदी केल्यावर ग्राहकांना हे नाणे मिळणार असून, त्याचा उपयोग डिस्काउंट्स आणि ऑफर्स मिळवण्यासाठी करता येईल. भविष्यात रिलायन्स पेट्रोल पंप, जिओ मार्ट आणि इतर जिओ सेवांमध्ये याचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
जिओ क्वाईन कसे मिळवाल?
1. सर्वप्रथम JioSphere अॅप Android किंवा iOS डिव्हाईसवर डाउनलोड करा.
2. अॅपमध्ये तुमचे खाते तयार करा.
3. जसा तुम्ही जिओच्या विविध सेवांचा वापर कराल, तसा तुम्हाला रिवॉर्ड म्हणून जिओ क्वाईन मिळतील.
जिओ क्वाईन डिजिटल व्यवहारात नवा बदल घडवणार?
रिलायन्स जिओच्या या नव्या पावलामुळे भारतीय डिजिटल पेमेंट आणि लॉयल्टी रिवॉर्ड सिस्टममध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जर हे टोकन जास्त प्रमाणात वापरले गेले, तर भविष्यात ते क्रिप्टोकरन्सीच्या धर्तीवर व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.