जिओ फायनान्शिअल शेअर्सची किंमत पुन्हा घसरली, स्टॉक होल्ड करावा की सेल ? तज्ञांनी दिली मोठी माहिती

शेअर बाजारातील घसरणीमुळे आत्तापर्यंत गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. दरम्यान, या घसरणीच्या काळातच जिओ फायनान्शिअल शेअर्स बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. जिओ फायनान्शिअल शेअरच्या किमती काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरल्यात.

Published on -

Jio Finance Share Price : काल, 17 फेब्रुवारी 2025 रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात नरमाई दिसून आली. खरंतर गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे आणि यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. शेअर बाजारातील घसरणीमुळे आत्तापर्यंत गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

दरम्यान, या घसरणीच्या काळातच जिओ फायनान्शिअल शेअर्स बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. जिओ फायनान्शिअल शेअरच्या किमती काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरल्यात. मात्र असे असले तरी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या स्टॉकवर विश्वास दाखवत गुंतवणूकदारांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण जिओ फायनान्शिअल सर्विसेस या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील परिस्थिती, या स्टॉक साठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी काय टार्गेट प्राईस दिली आहे? याने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात किती परतावा दिला आहे? याचाच थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जिओ फायनान्शिअल शेअरची सध्याची स्थिती कशी आहे

मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिओ फायनान्शिअलचा स्टॉक -0.68 टक्क्यांनी घसरला अन सध्या तो 220.79 रुपयांवर ट्रेड करतोय. काल या स्टॉकने 223.60 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र नंतर यात घसरण झाली.

या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 394.70 एवढा नमूद करण्यात आला आणि 52 आठवड्याची निचांकी पातळी 217.14 रुपये एवढी नमूद करण्यात आली. सध्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,40,503 करोड रुपये इतके आहे अन सध्या कंपनीवर कोणतेच कर्ज नाही.

टार्गेट प्राईस किती?

जिओ फायनान्शिअलसाठी ऍव्हरेज 316.50 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. या स्टॉकसाठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी होल्ड रेटिंग दिली आहे. यासाठी 286 रुपयांची किमान टार्गेट प्राईस आणि 347 रुपयांची कमाल टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

स्टॉकने किती परतावा दिला?

जिओ फायनान्शिअलची शेअर बाजारातील गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली असता गेल्या 5 दिवसात हा स्टॉक -7.91 टक्क्यांनी, मागील 1 महिन्यात -20.86 टक्क्यांनी, मागील 6 महिन्यात -33.39 टक्क्यांनी, मागील 1 वर्षात -19.42 टक्क्यांनी घसरला आहे.

शिवाय YTD आधारावर हा शेअर -27.48 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये या कंपनीचा स्टॉक 2.79 टक्क्यांनी वधारला आहे. अर्थातच या स्टॉकची गेल्या काही वर्षांमधील कामगिरी एवढी खास राहिलेली नाही. मात्र तरीही स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या स्टॉक साठी होल्ड रेटिंग दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe