Jio Recharge Plan : जिओचे सिम असणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या एअरटेल आणि जिओ या दोन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा असून दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी परवडणारे रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत.
खरेतर, रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम मार्केटमधील परवडणारे दर आणि सर्वोत्कृष्ट नेटवर्क कव्हरेजसह स्वतःची एक वेगळी ओळख बनविली आहे. त्याच वेळी, जिओच्या प्रीपेड योजना सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केल्या गेल्या आहेत.
![Jio Recharge Plan](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Jio-Recharge-Plan.jpeg)
जिओने जे लोक कमी डेटा वापरतात त्यांच्यासाठी सुद्धा प्लॅन डिझाईन केले आहेत आणि जे लोक हाय-स्पीड हेवी वापरकर्ते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर प्लॅन आणले आहेत.
कंपनीकडून आपल्या ग्राहकांना आपल्या विविध रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, हाय-स्पीड डेटा आणि विनामूल्य एसएमएस तसेच जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लॉड सारख्या अॅप्समध्ये विनामूल्य प्रवेश यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
तथापि, आज आम्ही तुम्हाला जिओच्या काही लोकप्रिय रिचार्ज प्लानची माहिती देणार आहोत. खरेतर, कंपनीने स्वतःच या रिचार्ज प्लॅनची माहिती दिली आहे. दरम्यान आज आपण रिलायन्स जिओच्या याच टॉप चार लोकप्रिय रिचार्ज प्लानची माहिती पाहणार आहोत.
हे आहेत जिओचे लोकप्रिय रिचार्ज प्लॅन
249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : जिओचा हा लोकप्रिय रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीचा आहे. हा डेली वन जीबी डेटाचा रिचार्ज प्लॅन आहे म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसात 28 जीबी डेटा मिळतो. यासह, विनामूल्य कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळतात.
299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : हा देखील 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज दीड जीबी डेटा मिळतो. यासोबतच विनामूल्य अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज शंभर एसएमएस सुद्धा मिळतात.
399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : हा देखील 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे यामध्ये ग्राहकांना दररोज अडीच जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ सुद्धा मिळतो.
859 रुपयांचा रिचार्ज प्लॅन : जिओचा हा रिचार्ज प्लान 84 दिवसांचा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी डेटा मिळतो. सोबतच विनामूल्य अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुद्धा मिळतात. जिओसिनेमा, जिओओटीव्ही आणि जिओ क्लाऊडची सदस्यता सुद्धा मिळते.