Pune Local News : राजधानी मुंबईत दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य दाखवतात. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. दरम्यान आता राजधानी मुंबई प्रमाणेच पुण्यातही लोकलचे जाळे विस्तारले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका टाकली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या कामाला आता लवकरच गती मिळणार आहे. यामुळे पुणे ते लोणावळ्या दरम्यानचा प्रवास वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात आलीये.

प्रकल्पाच्या डिटेल्स जाणून घ्या
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, MRVC म्हणजे मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. खरेतर, या प्रकल्पाचा डीपीआर कधीच पूर्ण झाला आहे, जवळपास पाच वर्षांपूर्वी या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता.
दरम्यान गेल्या वर्षी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या प्रकल्पाचा सुधारित डीपीआर हा राज्य सरकारकडे सादर केला. मात्र, अजून राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिलेली नाही आणि यामुळे हा प्रकल्प बारगळला की काय अशा चर्चा सुरू होत्या. पण आता या प्रकल्पाच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठे आश्वासन दिलेले आहे.
काय म्हणालेत रेल्वेमंत्री?
या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होईल असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले. दरम्यान रेल्वे मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आता या प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठकींचा सिलसिला सुरू झाला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राजधानी मुंबईत या प्रकल्पाच्या अनुषंगाने मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीतून या प्रकल्पाच्या संदर्भात कॅबिनेट नोट तयार झाली असल्याची माहिती समोर आली. महत्त्वाची बाब अशी की लवकरच ही कॅबिनेट नोट आता कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठवली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतर या मार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 पासून या मार्गाचे काम सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला जातोये. दरम्यान या नव्या मार्गिकांमुळे लोकल आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार असे प्रकल्पाशी निगडित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जाणकार लोक सांगतात की, पुणे ते लोणावळा दरम्यानचा सध्याचा मार्ग प्रामुख्याने लोकल गाड्यांसाठी वापरला जाईल, परिणामी आता मेल/एक्स्प्रेस गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच पुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.