Kaju Badam Rate : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उध्वस्त केलेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अगदीच युद्धजन्य परिस्थिती तयार झाली. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे व्यापारावर देखील विपरीत परिणाम दिसला आहे.
दरम्यान सध्या स्थितीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. दोन्ही देशांकडून युद्धबंदी प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी दोन्ही देशांमधील व्यापार अजूनही सुरळीत सुरू झालेला नाही आणि याचाच परिणाम म्हणून देशात सध्या ड्रायफ्रूट चे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्की कडून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट्स येतात. मात्र तुर्की या देशाने युद्धजन्य काळात पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि साहजिकच तुर्कीच्या विरोधात भारतात संतापाची लाट उसळली आहे.
तुर्की या देशाने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आणि यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि सरकारकडून तसेच सर्वसामान्य व्यापाऱ्यांकडून नागरिकांकडून तुर्की मधून आयात होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे.
देशातील कॅट या व्यापारी संघटनेने या वस्तूंवर बहिष्कार टाकला असून याचाच परिणाम म्हणून देशात काही वस्तू महाग झाल्या आहेत. या बहिष्कारचा परिणाम सर्वात जास्त ड्रायफ्रूट्स आणि मसाला उत्पादनांवर होतोय.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट आणखी बिघडण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपण युद्धजन्य परिस्थिती नंतर ड्रायफ्रूट चे रेट किती वाढले आहेत आणि सध्याचे ड्रायफ्रूट चे लेटेस्ट रेट अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा आहोत.
ड्रायफ्रूटचे रेट किती वाढलेत
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूट चे रेट वाढले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशातून ड्रायफ्रूटची आयात घटलेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात, वाहतूक यावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत, यामुळे ड्रायफ्रूटचा बाजारातील पुरवठा कमी झालाये.
याचा परिणाम म्हणून ड्रायफ्रुटचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ड्रायफ्रूट चे भाव हे किलोमागे 100 ते 400 रुपयांनी वाढले आहेत. काजू बदाम अंजीर अशा विविध ड्रायफ्रूट चे रेट वाढलेले आहेत.
दरम्यान व्यापाऱ्यांनी पुढील काही दिवस ही स्थिती अशीच कायम राहू शकते असा अंदाज दिलेला आहे. आता आपण काजू बदाम सहित सर्व प्रकारच्या ड्रायफ्रूट चे बाजारातील सध्याचे रेट समजून घेणार आहोत.
ड्रायफ्रूटचे सध्याचे रेट कसे आहेत ?
बदाम : देशातील काही बाजारांमध्ये बदामाचे भाव हे जवळपास 1800 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
खारीक : खारीकचे रेट 200 ते 250 रुपये किलो असे झाले आहेत.
खजूर : खजूरचे भाव सुद्धा 200 ते 250 रुपये प्रति किलो असे झाले आहेत.
शहाजिरे : याचा भाव 1100 ते 1200 रुपये प्रति किलो असा आहे.
खसखस : खसखसचे रेट 1400 ते 1600 रुपये प्रति किलो असे आहेत.
अंजीर : अंजीरचा भाव 1400 ते 1800 रुपये प्रति किलो असा झालाये.
पिस्ता : पिस्ता बाराशे ते पंधराशे रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध आहे.
अक्रोड : अक्रोड 800 ते 900 रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध आहे.
मगज बीज : याचे भाव 1400 ते 1500 रुपये प्रति किलो असे आहेत.