Khatoo Shyamji Darshan Bus : गेल्या काही महिन्यांमध्ये राजस्थान येथे स्थित खाटू नरेश खाटू श्यामजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेकजण खाटू श्यामजीच्या दर्शनासाठी राजस्थान येथील सीकर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र खाटू येथे गर्दी करत आहेत.
महाराष्ट्रातूनही असंख्य भाविक मंडपिया नरेश सावरिया सेठ खाटू श्यामजी आणि सालासर बालाजीच्या दर्शनासाठी जाताना दिसतायेत. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता या तीनही देवस्थानच्या दर्शनासाठी गर्दी करतांना दिसत आहेत.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे.
कारण की आता जळगावातून थेट मंडपिया नरेश सावरिया सेठ, खाटू श्यामजी आणि सालासर बालाजी धाम साठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता आपण परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येणाऱ्या या बससेवेचे संपूर्ण वेळापत्रक तसेच या बसचे भाडे किती असेल याचा सर्व आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
राजस्थानातील या तीन प्रमुख तीर्थक्षेत्राला भेटी देणाऱ्या भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली असून ही बस सेवा 28 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे.
महामंडळाच्या पॅकेज टूर्स या संकल्पनाच्या अंतर्गत ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष्य बससेवेच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर 28 नोव्हेंबरला विशेष बस जळगाव येथून सुटणार आहे आणि त्याच दिवशी सावरीया शेठ येथे पोहोचेल.
या बसचा पहिला मुक्काम सावरिया सेठ येथे राहणार आहे. 29 नोव्हेंबरला बस चितोडगड येथे जाईल आणि तेथून पुढे खाटू श्यामला मुक्काम होईल. दरम्यान तीस नोव्हेंबरला भाविकांचे सालासर बालाजी येथील दर्शन होईल आणि त्यानंतर मग बसचा प्रतीचा प्रवास सुरू होणार आहे.
बसचे तिकीट किती असेल?
या विशेष बसने प्रवास करण्यासाठी 4,825 रुपये प्रति प्रवासी इतके तिकीट काढावे लागेल. या बस सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना रिझर्वेशन करावे लागणार आहे. आगाऊ बुकिंग साठी जळगाव आगाराशी संपर्क साधावा लागणार आहे.













