Upcoming 7-seater Cars : भारतात नेहमीच 7 सीटर कारची डिमांड असते. यामुळे अनेक ऑटो दिग्गज कंपन्यांनी 7 – सीटर कारची निर्मिती केली आहे. सध्या स्थितीला मात्र देशात दोन सेवन सीटर कार सर्वाधिक विकल्या जात आहेत आणि त्या आहेत टोयोटा फॉर्च्युनर आणि महिंद्रा XUV700.
मात्र आता या दोन्ही गाड्यांना टक्कर देण्यासाठी लवकरच मार्केटमध्ये आणखी दोन नवीन 7 सीटर कार लॉन्च केल्या जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे 2025 मध्ये या अपकमिंग सेवन सीटर कार लॉन्च होऊ शकतात.

या दोन 7 सीटर कार लाँच होणार
अशा परिस्थितीत आज आपण मे महिन्यात कोणत्या कंपन्या सेव्हन सीटर कार लॉन्च करणार आणि त्या कारचे वैशिष्ट्य नेमके काय असणार ? याचा आढावा आजच्या या लेखातून घेणार आहोत.
MG Majestor
MG कंपनी लवकरच भारतात एक नवीन सेवन सीटर कार लॉन्च करणार असल्याची बातमी हाती आली आहे. मे महिन्यात देशात दोन नवीन सेवन सीटर कार लॉन्च होणार आहेत आणि यात एमजी कंपनीच्या कारचा सुद्धा समावेश राहणार आहे. खरेतर एमजी कंपनीकडून भारतात अलीकडेच ग्लोस्टर SUV कार लाँच करण्यात आली.
मात्र या एसयूव्हीला देशातील ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आता कंपनी एक नवीन सेवन सीटर बाजारात उतरवणार आहे. आता, कंपनी ब्रँड ग्लोस्टरवर आधारित आणखी एक एसयूव्ही सादर करण्यास सज्ज असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
मात्र अपकमिंग सेवन सीटर कार ही आधीच्या सेव्हन सीटर कार पेक्षा अधिक प्रीमियम राहणार असल्याचा दावा केला जात आहे. एमजी कंपनी लवकरच एमजी मॅजेस्टर ही सेवन सीटर कार भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या एसयूव्ही बाबत बोलायचं झालं तर ही एसयूव्ही मे 2025 मध्ये लाँच होणार अशी माहिती हाती आली आहे.
ही कंपनीची आगामी सेवन सीटर कार ग्लोस्टरवर आधारित असली तरी, मॅजेस्टरची डिझाइन वेगळी राहणार आहे. या आगामी सेव्हन सीटर कार मधील हेडलॅम्प सेटअप पूर्णपणे वेगळा राहणार आहे. यात मोठे अलॉय व्हील्स आणि कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प सुद्धा असतील. या कारमधील इंटीरियर डिझाइन देखील पूर्णपणे वेगळे राहणार आहे.
यात मोठी टचस्क्रीन सिस्टम, अँबियंट लाइट्स, एसी व्हेंट्ससाठी नवीन डिझाइन आणि बरेच काही अपग्रेडेड फीचर्स पाहायला मिळणार आहेत. मात्र या गाडीचे इंजिन नेमके कसे राहणार याबाबत अजून तरी कोणतीच ठोस माहिती हाती आलेली नाही.
Kia Clavis
या महिन्यात दोन सेवन सीटर कार लॉन्च होणार आहेत आणि या दोन 7-सीटरपैकी एक कियाची राहणार आहे. Kia ची अपकमिंग सेवन सीटर कार मोठ्या प्रमाणात कॅरेन्सवर आधारित राहणार आहे.
एकंदरीत दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी किआ मोटर या महिन्याची सुरुवात धमाकेदारपणे करण्याची तयारी करत आहे. काल 01 मे 2025 रोजी कंपनीने त्यांच्या आगामी नवीन कार किया क्लॅव्हिसचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे.
ही नवीन एमपीव्ही 8 मे रोजी अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली जाईल अशी माहिती सुद्धा यावेळी समोर आली आहे. कंपनीने या एमपीव्हीला एक अतिशय अनोखा लूक आणि डिझाइन दिले आहे. तथापि, कियाने म्हटले आहे की, ही अपकमिंग कॅरेन्ससोबत विकली जाणार आहे. याचा अर्थ असा की, नवीन 7-सीटर कॅरेन्सच्या वरच्या भागात ठेवली जाऊ शकते.
याव्यतिरिक्त, येणाऱ्या किआ कारमध्ये एक नवीन नेमप्लेट असेल – जी स्वतःला कॅरेन्सपेक्षा वेगळे करेल, अशी माहिती जाणकारांकडून समोर आली आहे. खरंतर, नवीन किआ क्लॅव्हिस ही कंपनीने विकलेल्या प्रसिद्ध एमपीव्ही किआ कॅरेन्सची नवीन फेसलिफ्ट मॉडेल आहे. पण कंपनीने ती पूर्णपणे नवीन शैलीत सादर करण्याची तयारी केली आहे.
म्हणूनच, किआ इंडियाने या कारला एक नवीन नाव देखील दिले आहे. कंपनीचा दावा आहे की केवळ नाव बदललेले नाही तर ग्राहकांना या एमपीव्हीमध्ये अशा अनेक गोष्टी मिळतील ज्या आधी देण्यात आल्या नव्हत्या. दरम्यान, पूर्णपणे नवीन किआ 7-सीटर कार 8 मे 2025 रोजी लॉन्च होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या गाडीत नवीन 7-सीटर हेडलॅम्प डिझाइन किआ सायरोसपासून प्रेरित असल्याचे दिसून आले आहे. या अपकमिंग कार च्या फीचर्स बाबत बोलायचं झालं तर यात पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल-2 एडीएएस समाविष्ट राहणार आहेत.
या गाडीचे इंटेरियर कसे राहणार याबाबत अजून ठोस माहिती समोर आलेले नाही पण आपण सायरोसमध्ये जसे इंटेरियर आहे तसे यामध्ये असू शकते अशी अपेक्षा करू शकतो.
या अपकमिंग कारमध्ये 12.3 इंच टचस्क्रीन सिस्टम, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हरमन कार्डन साउंड सिस्टम, फ्रंट आणि रियर व्हेंटिलेटेड सीट्स आणि आणखी बरेच काही पाहायला मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.