Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते आणि यंदा देखील उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय वाढू शकते असा अंदाज आहे.
याचमुळे आता मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान समर्थ स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी काल 7 एप्रिल 2025 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक ?
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 01103 /01104 क्रमांकाची एलटीटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल ट्रेन पाच मे 2025 पर्यंत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर सोमवारी एलटीटीहून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी ही गाडी मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन दर रविवारी मडगाव येथून सायंकाळी साडेचार वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार स्पेशल ट्रेन?
कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन या मार्गावरील ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी,
कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकात थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. नक्कीच, कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या स्पेशल ट्रेनमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून रेल्वेकडून या स्पेशल ट्रेनचा प्रवाशांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.