Kotak Mahindra Bank Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वप्नाचे घर बनवायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. स्वप्नातील घरांसाठी जर होम लोन घ्यायचे असेल तर ही बातमी विशेष फायद्याची ठरणार आहे. कारण की आज आपण कोटक महिंद्रा बँकेच्या होम लोन ची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मंडळी तुम्हाला जर होम लोन घ्यायचे असेल, कमी व्याज दरात होम लोन हवं असेल तर तुमच्यासाठी कोटक महिंद्रा बँकेचा पर्याय सर्वाधिक फायद्याचा राहणार आहे. खरे तर देशातील विविध बँका आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
मात्र यात कोटक महिंद्रा बँकेचे व्याजदर सर्वाधिक आकर्षक दिसलेत. ही बँक आकर्षक व्याजदरात आपल्या ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देते शिवाय बँकेची कर्ज मंजुरीची प्रोसेस देखील फारच सोपी आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण जर कोटक महिंद्रा बँकेकडून 20 लाखांचे गृह कर्ज 20 वर्षांसाठी घेतले तर ग्राहकाला किती ईएमआय भरावा लागणार? याचाच आढावा घेणार आहोत.
कोटक महिंद्रा बँकेचे गृह कर्जासाठी चे व्याजदर
कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना किमान 8% व्याजदरात गृहकर्ज देते. मात्र हे बँकेचे फ्लोटिंग रेट आहेत. तसेच बँकेचा हा किमान इंटरेस्ट रेट आहे. या किमान इंटरेस्ट रेट चा लाभ फक्त आणि फक्त ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर अधिक आहे त्यांनाच मिळेल.
पण ग्राहकांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँकेचे हे फ्लोटिंग रेट असल्याने यामध्ये सातत्याने बदल होत राहतात. म्हणजेच तुम्ही जर या व्याजदरात कर्ज घेतले तर कर्ज परतफेडीच्या कालावधीत जेव्हा-जेव्हा बँकेचे हे फ्लोटिंग रेट चेंज होतील तेव्हातेव्हा तुमचा ईएमआय कमी होईल किंवा मग जास्त होईल.
Kotak Mahindra Bank होम लोनसाठीची पात्रता
अर्जदाराचे वय हे 21 ते 60 वर्ष यादरम्यान असायला हवे. अर्जदाराकडे एक निश्चित उत्पन्नाचे स्रोत असायला हवे. म्हणजेच एकतर अर्जदार हा नोकरी करणारा असावा किंवा मग व्यवसाय करणारा असावा. निश्चित इन्कम असणाऱ्या लोकांना बँकेकडून कर्ज दिले जाते.
तसेच अर्जदाराचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला त्यांना बँकेकडून लवकर कर्ज मंजूर होते आणि कमी व्याजदरात कर्ज मंजूर होते. सरकारी कर्मचारी, खाजगी कर्मचारी तसेच व्यवसायिकांना देखील बँकेकडून कर्ज मिळते.
किती ईएमआय द्यावा लागेल?
20 वर्ष कालावधीसाठी कोटक महिंद्रा बँकेकडून वीस लाखांचे कर्ज किमान 8% व्याजदरात मंजूर झाले तर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला 15,743 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच वीस वर्षाच्या काळात सदर व्यक्तीला 37 लाख 85 हजार 320 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये वीस लाख रुपये ही कर्जाची रक्कम राहणार आहे आणि उर्वरित 17 लाख 85 हजार 320 रुपये त्या संबंधित ग्राहकाला व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.