Ladaki Bahin Yojana : तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात का मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे.
खरंतर अलीकडेच राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे आणि महिला आता पुढील त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान जानेवारीच्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी आता उपलब्ध झालेला आहे. याचाच अर्थ येत्या काही दिवसांनी महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा पंधराशे रुपयांचा लाभ जमा होणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या योजनेसाठी ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून समोर आली आहे. खरे तर डिसेंबर चा हफ्ता महापालिका निवडणुकांच्या आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारी रोजी जमा झाला होता.
आता फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या आदेशानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान योजनेच्या हप्त्यासाठी पैशांची उपलब्धता झाली असल्याने जानेवारी २०२५ चा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात मतदानापूर्वीच जमा होणार असल्याची खात्री सरकारकडून देण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये जमा केले जाणार आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निधीचा लाभ प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना दिला जाणार आहे. दरम्यान, काही महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे अडकले होते.
मात्र आता त्या प्रकरणांची पडताळणी करून हे अडकलेले हप्तेही युद्धपातळीवर वितरित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकून चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचे हप्ते थांबले होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून, पात्र महिलांचा लाभ कोणत्याही कारणाने अडू नये यासाठी काटेकोर तपासणी केली जात आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचवणे ही सरकारची प्राथमिकता आहे.
तांत्रिक अडचणींमुळे कुणाचाही हप्ता थांबणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत.” एकूणच, लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता, राज्यातील महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेसाठी एक विश्वासाचं पाऊल ठरत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.













