लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! जानेवारीचा हफ्ता कधी जमा होणार ? CM फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना बनली आहे. याअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांचा थेट लाभ जमा केला जातो.

या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. या योजनेतून सण-उत्सवांच्या काळात सरकारकडून आगाऊ हप्ता देण्याची परंपरा राहिली आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस देण्यात आला होता.

त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित लाभ मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आणि आदर्श आचारसंहितेमुळे या निर्णयावर वाद निर्माण झाला.

काँग्रेस पक्षाने मतदानापूर्वी अशा प्रकारे लाभ देणे चुकीचे असल्याचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडली. आयोगाने डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले, मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव केला.

सरकारच मोठं आश्वासन

CM फडणवीस यांनी यावर भाष्य केलंय. काही लोकांच्या पोटात दुखतं म्हणून ते निवडणूक आयोगाकडे गेले. आयोगाने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही मान्य करतो. मूळ हप्ता आम्ही देतच आहोत आणि तो दिला गेला आहे.

सणाच्या काळात आम्ही आगाऊ हप्ता देतो, मात्र आयोगाने आगाऊ देऊ नका असे सांगितले आहे. त्यामुळे १६ तारखेनंतर आम्ही जानेवारीचा हप्ता देऊ,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या योजनांचा नियमित लाभ देता येईल. मात्र, अग्रिम लाभ देणे, नवीन लाभार्थी निवडणे किंवा योजनेचा विस्तार करणे अनुमत नाही.

तारीख झाली फिक्स 

लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता 16 जानेवारीनंतर मिळण्याची शक्यता आहे. सरकारने दिलेल्या या आश्वासनामुळे आता महिलांना दिलासा मिळाला आहे. आता सर्वांचे लक्ष हप्ता जमा होण्याच्या तारखेकडे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe