लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ! केवायसीबाबत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. खरे तर केवायसी प्रक्रिया बाबत फडणवीस सरकार पुन्हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना 2024 मध्ये सुरू झाली.

या योजनेचा निवडणुकीच्या कालावधीत महायुतीला प्रचंड लाभ मिळाला. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला चांगल्या जागा मिळाल्यात.

इतिहासातील सर्वात मोठे बहुमत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात टाकले. यामुळे ही योजना अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. तसेच ही योजना चर्चेतच राहावी यासाठी सरकार तसेच विरोधक सुद्धा प्रयत्न करताना दिसतात.

विरोधकांकडून ही योजना सरकार लवकरच बंद करणार असा आरोप केला जातोय तर दुसरीकडे महायुती सरकार ही योजना कधी बंद होणार नाही, याउलट याचा लाभ वाढत राहणार असे सांगत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रति महीना असा लाभ दिला जातो.

राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जात असून आता या योजनेच्या लाभासाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून केवायसी करिता शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत डेडलाईन दिली आहे.

मात्र अजूनही राज्यातील जवळपास 80 लाख लाभार्थी केवायसीच्या प्रक्रियेविना आहेत. यामुळे पुन्हा एकदा केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ मिळण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.

असे असतानाच महिला व बालविकास विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सरकार पुन्हा एकदा केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते.

खरंतर, सुरुवातीला या योजनेसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली. 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत केवायसी साठी शासनाने मुदत दिली होती. पण या मुदतीत फक्त काही लाख लाभार्थ्यांची केवायसी झाली आणि म्हणूनच शासनाने आता 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

दरम्यान या मुदतीत सुद्धा सगळ्याच लाभार्थ्यांची केवायसी होणे अशक्य असल्याचे समजते आणि म्हणूनच जानेवारी पर्यंत केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.

खरेतर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ सर्वांना मिळणार आहे. पण, फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या महिला लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळणार, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News