लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही ? आता घरबसल्या पाहता येणार, पहा…

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाची योजना. याची सुरवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक माहीन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. मात्र आता योजनेच्या लाभासाठी लाडक्या बहिणींकरिता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

केवायसी साठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली होती. 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसी करण्यासाठी सरकारने मुदत दिली होती मात्र या मुदतीत अनेक लाभार्थ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही.

विविध तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना केवायसी करताना अडचणी येत होत्या. यामुळे लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ मिळायला हवी अशी मागणी उपस्थित केली होती.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने देखील लाडक्या बहिणींना दिलासा देत केवायसी ची प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

म्हणजेच आता केवायसीसाठी लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी केवायसी ची प्रक्रिया आणखी सोपी करण्यात आली आहे.

अशा लाभार्थ्यांना आता पती किंवा वडिलांच्या आधार कार्ड पडताळणी ऐवजी इतर कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली आहेत आणि ही कागदपत्रे महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जमा करण्याचे निर्देश मिळालेले आहेत.

दरम्यान आज आपण लाडक्या बहिणींसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण लाडक्या बहिणींची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे कसे तपासायचे याबाबत माहिती पाहणार आहोत.

 केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही कसे तपासायचे?

 केवायसी ची माहिती जाणून घेण्यासाठी सुरुवातीला ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. वेबसाईटवर गेल्यानंतर केवायसीच्या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा.

यानंतर मग तुम्हाला Send OTP पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर पुढीलपैकी एक मेसेज दिसेल. e-KYC already completed असा पर्याय दिसला की समजून जा तुमची केवायसी पूर्ण झाली आहे.

पण जर Aadhaar number is not in the eligible list असे दिसले की समजून जायचे तुमचं नाव लिस्टमध्ये नाहीये. तसेच जर Complete your e-KYC अस दिसलं की तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News