लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! केवायसी चुकली तरी पण मिळणार हफ्ता, आता फक्त…..

Published on -

Ladaki Bahin Yojana Latest Update : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2024 मध्ये लाडकी बहिण योजना सुरू झाली. याद्वारे पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत.

अलीकडेच या योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यात आला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत आणि यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.

महापालिका निवडणुकीच्या आधी मकर संक्रांतीचा सण साजरा झाला आणि नेमक्या याच सणाच्या दिवशी हे पैसे जमा झालेत त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मात्र या योजनेचा काही महिलांना लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. योजनेसाठी आता केवायसी बंधनकारक असून केवायसी न झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ गोठवण्यात आला आहे.

एवढेच नाही तर काही महिलांची केवायसी झालेली असतानाही त्यांना लाभ मिळत नाहीये कारण की केवायसी मध्ये चुकीची माहिती नमूद झाली आहे. दरम्यान आता अशाच महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे.

ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक व मानवी चुका अनेक महिलांसाठी मोठा आर्थिक अडथळा ठरल्या होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांच्या हप्त्यावर अनेक कुटुंबांचे घरखर्च अवलंबून आहेत.

मात्र ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हजारो महिलांचा हा हप्ता थांबला होता. यामुळे महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

बुलढाणा जिल्ह्यात या असंतोषाचे रूपांतर थेट आंदोलनात झाले. १९ जानेवारी रोजी संतप्त लाडक्या बहिणींनी महिला व बालकल्याण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले, तर २० जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. बुलढाण्यासह राज्यातील अनेक भागांत अशा प्रकारची आंदोलने झाली, ज्यामुळे शासनावर दबाव वाढला.

या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी बुधवारी राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

या बैठकीत ई-केवायसीमध्ये चूक झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अशा महिलांना पूर्ववत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे ३० हजार महिलांना दिलासा मिळाला असून, राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींना याचा फायदा होणार आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत २०२५ च्या सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. मात्र डिजिटल प्रक्रियेची सवय नसल्याने अनेक महिलांकडून चुकून चुकीचे पर्याय निवडले गेले आणि त्याचा फटका त्यांना बसला.

दरम्यान, “कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही,” असा ठाम विश्वास सचिव अनुपकुमार यादव यांनी व्यक्त केला आहे. येत्या आठ दिवसांत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार ई-केवायसी चुकलेली किंवा चुकीचा पर्याय निवडलेली महिलांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करून महिलांना पुन्हा आर्थिक आधार मिळणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News