Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. या योजनेबाबत पुन्हा शासनाचे नवीन आदेश धडकले आहेत. या नव्या आदेशानुसार, पुन्हा एकदा योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आता केवायसीच्या प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली आहेत.
या संदर्भातील सरकारी आदेश नुकतेच जारी झाले असून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भातील डिटेल माहिती दिलेली आहे.

अशा स्थितीत आता आपण केवायसी करण्यासाठी महिलांना आता कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत आणि ही कागदपत्रे कोणत्या लाभार्थ्यांसाठी बंधनकारक राहणार याची डिटेल माहिती समजून घेऊयात.
खरे तर, सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी केवायसी बंधनकारक केली असून यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे, या योजनेची केवायसी आता 31 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार अशी माहिती सरकारने दिलेली आहे.
दुसरीकडे, ज्या महिलांचे वडील तसेच पती हयात नव्हते त्यांना केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. पण, आता त्यांची ही अडचण दूर करण्यात आली आहे. कारण की, अशा लाभार्थ्यांसाठी केवायसीची नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे.
ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना आता केवायसी करतांना फक्त स्वतःची केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी.
काय सांगितलं अदिती तटकरेंनी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC मुदतवाढ!
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.
परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे.
त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.
या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.













